एसटीत ५० टक्के सूट तरी, काही महिलांना भरावा लागतोय दंड, कारण

| Updated on: Jun 16, 2023 | 11:07 AM

एसटीत महिलांची अधिक गर्दी असते, असं सध्या तुम्ही कोणत्याही बसमध्ये चढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. परंतु या सगळ्यामध्ये काही महिला अर्धी सुध्द तिकीट काढत नसल्याचं उघडकीस आलं आहे. भरारी पथकाच्या कारवाईनंतर...

एसटीत ५० टक्के सूट तरी, काही महिलांना भरावा लागतोय दंड, कारण
msrtc latest news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वाशिम : एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्या पासून महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळते. एसटीमध्ये (MSRTC Bus) सध्या महिलांची संख्या ८० टक्क्यांच्या दरम्यान असते. तर २० टक्के पुरुष पाहायला मिळतात. गाड्या नेहमी फुल्ल असल्यामुळे एसटी फायद्यात असल्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे.  त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) घेतलेल्या निर्णयावरती महिला देखील अधिक आनंदी आहेत. विशेष म्हणजे भरारी पथकाने नुकतीचं कारवाई केली. त्यामध्ये अनेक महिला विना तिकीट प्रवास करीत असल्याच्या आढळून आल्या आहेत. वाशिम (Washim St News) जिल्ह्यात एसटी बसच्या तपासणीसाठी पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. कारवाई होत असल्यामुळे महिला जागृत झाल्या आहेत.

५० टक्के सवलत असून देखील…

एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिली आहे. शिवाय ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. यानंतरही काही महिला तिकीट न काढता प्रवास करीत आहेत. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी अकोला विभागात पाच भरारी पथके तैनात असून, ही पथके सातत्याने बसगाड्यांची तपासणी करत असतात. भरारी पथकाने केलेल्या तपासणीत पाच महिन्यांत तिकीट काढता प्रवास करणारे ३२ प्रवासी आढळून आले आहेत.

काल वाशिम जिल्ह्यात एका भरारी पथकाने…

महिलांना ५० टक्के सवलत मिळाली, त्यानंतर गाड्यांमध्ये महिलांची गर्दी वाढली आहे. निम्म्या तिकिटात प्रवास होत असूनही काही महिला तिकीट काढत नाहीत. अशा महिला प्रवासी भरारी पथकाच्या कारवाईत आढळून आल्या आहेत. त्या सहा महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुध्दा अशा पद्धतीने अनेक महिला प्रवास करीत असाव्यात अशी शंका अनेकांनी त्यावेळी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात अजूनही काही आगारात जुन्या बस चालवल्या जात आहेत. त्या वाटेत कुठेही बंद पडत असल्याची घटना आपण वारंवार पाहत आहोत. त्यामुळे नव्या बसेसची मागणी अनेकदा प्रवासी करीत आहेत. नादुरुस्त बस महामंडळ रस्त्यावर चालवत असल्यामुळे त्याचा लोकांना फटका बसतं आहे.