आज महाराष्ट्रतल्या काही जिल्ह्यात अकाशातून काहीतरी पडताना (Meteor Showers) लोकांना दिसलं. तसे अनेक व्हिडिओही समोर (Meteor Showers Video) आले मात्र नेमकं काय पडलं? याचा ठावठिकाणा कुणालाच लागेना झाला. आकाशातून लाल झोत दिसणारी वस्तू चंद्रपूर जिल्ह्यात कोसळली आहे. आकाशात 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान मोठ्या आगीच्या लोळासह वस्तू खाली पडताना लाखो लोकांनी अनुभवले, असेल्याचे अनेक लोक सांगत आहेत. यापैकी एक रिंग सदृश्य वस्तू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी येथे कोसळल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. आकाशात आधी तारा तुटल्या सारखा भास होत नंतर गडगडाटासह ही वस्तू कोसळली. असे स्थानिकांनी सागितले आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं? याचा शोध सुरू झाला आहे. गावाडकडे यावरून अनेक उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. यात एका महिलेने तर आम्हाला रशिया युक्रेन युद्धाचे बॉम्ब (Russia Ukraine War) पडताहेत की काय असं वाटलं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर आलो, त्यानंतर लहान मुलांनी रॉकेट पडतंय असे म्हणत वाशिमधील लोकांचे लक्ष वेधल्याचे सांगितले. त्यांना आकाशातून काही वस्तू खाली पडताना दिसली. त्यानंतर लोकांनी याही वस्तुचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. काहींना तर हे युक्रेनमधील युद्दात जसे बॉम्ब पडले असेच वाटले.
वाशिममध्ये उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे, नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा उल्कापात कैद केला आहे
अशाच बातम्यांसाठी https://t.co/ZVrpFyfwmI वर क्लिक करा#MeteorShower #Maharashtra #FallingStar pic.twitter.com/h6FsUWYCek
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
अमरावती, अकोल, गडचिरोली जिल्ह्यातही काही अशाच वस्तू दिसून आल्या आहेत. त्यामुळे अनेक लोक घाबरून गेले आहेत. यावेळी घाबरलेल्या लाडबोरीच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. थोड्या वेळाने घटनास्थळी शोध घेतल्यावर ही रींग आढळल्यावर नागरिकांनी ही वस्तू सिंदेवाही पोलीस ठाण्यात आणून जमा केली.
चंद्रपूरमध्ये नेमकं काय पडलं, उल्कापात की उपग्रहाचा तुकडा pic.twitter.com/gHbX204wJT
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
चंद्रपुरात उपग्रह पडला की उल्कापात झाला असा प्रश्न सध्या अनेक लोकांच्या मनात आहे. याबाबत अध्याप कोणतीही ठोस माहिती समोल आहे आहे. अमरावती जिल्ह्यातही असेच काही व्हडिओ समोर आले आहेत.
अमरावतीमध्ये उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे, नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा उल्कापात कैद केला आहे
अशाच बातम्यांसाठी https://t.co/ZVrpFyfwmI वर क्लिक करा#MeteorShower #Maharashtra #FallingStar pic.twitter.com/nkLcAaA5uN
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022