वाशिम : मुस्लिम (Muslim) समाजाचा पवित्र सण असलेला रमजान सुरू असताना राजकीय मंडळींकडून मशिदीवर भोंगे काढण्याचे वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे वाशिम कारागृहात शिक्षा भोगत असलेले 16 हिंदू कैद्यांनी रोजे (fasting) दरम्यान सद्यस्थितीत वाशिम कारागृहात 16 मुस्लिम आणि 16 हिंदूंनी रोजे ठेवले असल्याने भाई चारच्या उदाहरण जगासमोर मांडले आहे. भोंगे कुणी वाचवायचं. कुणाला परवानगी द्यायची की नाही. यावरून राजकारण तापलं असताना वाशिममध्ये मात्र वेगळंच चित्र आहे. वाशिम कारागृहात बंदी रोजे करत आहेत. यामध्ये 16 हिंदूंचा सहभाग आहे. हिंदू (Hindu) बांधवही रोजे करत आहेत. यातून सर्वधर्मसमभावाचं चित्र निर्माण होतं. ते बंदीस्त राहून एकात्मतेनं राहतात. पण, शहाने लोकं स्वतंत्रपणे बाहेर राहून गोंधळ घालतात, याला काय म्हणावं.
एकीकडे समाजात रमजान महिन्यानिमित्त नमाज, रोजे सुरू आहेत. तर दुसरीकडे वाशिम जिल्हा कारागृहातील 32 कैदीही रोजे करीत आहेत. जिल्हा कारागृह प्रशासनाकडून त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कैदी हे रोजे करीत आहेत. कारागृहात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पाहायला मिळत आहे.
रमजान महिन्यानिमित्त रोजा, इफ्तार, सहेरी यांचे रोजचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. कारागृहातील या कैद्यांसाठी भोजनाची तयारी रात्री दोन वाजता सुरू करण्यात येते. पहाटे चार वाजता रोजा करणाऱ्या कैद्यांना जेवण तसेच चहा देण्यात येतो. तसेच दिवसभरात होणाऱ्या नमाज पठणासाठी त्यांची व्यवस्था करण्यात आलीय.