वाशिम : समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. यामुळे वाहन अधिक वेगाने धावू लागली. पण, या समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कुणीतरी वाहनांवर दगडफेक केली. तब्बल दोन तास ही दगडफेक सुरू होती. यामुळे कित्तेक वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने प्रवाशांना दगड लागली नाहीत. पण, या घटनामुळे समृद्धी मार्गावरून रात्री प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता हे दगडफेक करणारे कोण याचा शोध पोलीस घेत आहेत.
हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वनोजा इंटरचेंज येथून जवळच धक्कादायक घटना घडली. २१२ वर छत्रपती संभाजीनगर ते नागपूरकडे जात असणाऱ्या वाहनावर ३१ मार्च ला रात्री १० वाजताच्या दरम्यान दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकीमध्ये वाहनांचे बरेच नुकसान झाले. या घटनेमध्ये कोणीही दुखापतग्रस्त झाले नाही. नुकसान ग्रस्त वाहनधारकांनी वाहन हेल्पलाइनवर कॉल केला. पण, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित वाहनधारकांनी आयसी ०९ वनोजा टोल प्लाझा येथे येऊन माहिती दिली.
या दगडफेकीमध्ये आठ ते दहा वाहन क्षतिग्रस्त झाले. दगडगेक साधारण दोन तास झाल्याची माहिती मिळत आहे. समृद्धी महामार्गावर होत असलेल्या या दगडफेकीमुळे प्रवासांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच या दगड फेकीमध्ये मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एक आयशर गाडी नुकसानग्रस्त झालेली आहे.
ही दगडफेक कुणी आणि का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. या महामार्गावरून वाहन वेगाने धावतात. रात्रीचा प्रवासही सुरक्षित समजला जातो. त्यामुळे वाहन बिनधास्त जात असतात. पण, या घटनेमुळे वाहन चालक चांगलेच धास्तावले आहेत. आता विचारू करूनच या मार्गावरून त्यांना प्रवास करावा लागणार आहे.