चिमण्यांच्या संरक्षणासाठी झेडपीची मुलं सरसावली; विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं?

| Updated on: Mar 20, 2023 | 4:20 PM

जिल्हा परिषदेची ही शाळा गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवतात. शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थी हे काम करू शकतात. पर्यावरणाचं जतन यातून होते.

चिमण्यांच्या संरक्षणासाठी झेडपीची मुलं सरसावली; विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं?
Follow us on

वाशिम : निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक चिऊताई आहे. चिमणी हा पक्षी निसर्गाचा खरा अविभाज्य घटक आहे. लहानपणापासून लहान-थोरांपासून चिमणीविषयी आपुलकीची भावना आहे. परंतु वृक्षतोडीमुळे म्हणा की अन्य काही कारणांमुळे चिऊताईला जीवन जगणे असह्य होऊन बसले आहे. वाढत असलेले औद्योगिककरण आणि झपाट्याने होत असलेली वृक्षतोड यामुळं चिमणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून पक्ष्यांसाठी टाकाऊ वस्तूपासून घरटे तसेच कुत्रीम पाणवठे तयार केले. मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवतात. या जिल्हा परिषद शाळेच्या परिसर तसेच गावातील अनेक भागांत शेकडो चिमण्यांसह वेगवेगळे पक्षी दिसतात.

वाशीम जिल्ह्यातील कामरगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेतला. इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांची पशू पक्षी वाचवण्याची एक वेगळी धडपड सुरु आहे. त्याच्या धडपडीला साथ मिळत आहे इथल्या शिक्षकाची.

हे सुद्धा वाचा


१२ वर्षांपासून पाणवठे आणि चाऱ्यांची व्यवस्था

उन्हाळ्याचे दिवस आले की, माणसाबरोबर पशू-पक्षांनाही उन्हाच्या चटके सहन करावे लागतात. मानव जातीच्या प्राण्याला पाहिजे तेथून पाणी उपलब्ध करता येते. मात्र अशावेळी मुक्या पक्ष्यांचं काय असा विचार सर्वांनाच पडतो. मात्र याच विचारात पशुपक्षावर प्रेम करणाऱ्या वाशिम जिल्ह्यात हा एक वेगळा वर्ग आहे. तो कामरगावच्या शाळेतील विद्यार्थीवर्ग. या विद्यार्थ्यांना पशु-पक्षी यांच्याकरिता मागील 12 वर्षापासून पाणवठे आणि चाऱ्याची व्यवस्था करतात.

विद्यार्थी हे सारं करू शकतात. कारण त्यांना शिक्षकांकडून प्रोत्साहन असते. चांगले शिक्षक विद्यार्थी घडवतात. एकीकडं सरकारी शाळांत चांगले शिक्षण मिळत नसल्याचा आरोप केला जातो. परंतु, काही शाळांमधील शिक्षण अजूनही खूप चांगल्या दर्जाचं आहे. त्यामुळेचं गरीब विद्यार्थी पुढं जाऊ शकतात. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जातात.

चिमण्यांच्या संगोपनासाठी घरात बांधली ७० घरटी

दुसरीकडं, सर्वत्र चिमण्यांची संख्या घटत असल्याची ओरड होत आहे. पण, भुसावळ तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथील ठाणसिंग माणिक पाटील या तरुणाने चिमणी संगोपनाचा अनोखा संकल्प केला आहे. स्वतःचे घर आणि गोठ्यात त्यांनी चिमण्यांसाठी तब्बल ७० घरटी बांधली आहेत. गेल्या तीन वर्षात दोन ते तीन चिमण्यांची असलेली संख्या यंदा दीडशेच्या घरात पोहोचली आहे.