पुणे : पुणेकर नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मंगळवारी (21 सप्टेंबर) रोजी पुण्याच्या उत्तरत पूर्व भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तशी माहिती देण्यात आली आहे. लोहगाव, वडगाव शेरी, विमाननगर, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुले नगर, येरवडा, धानोरी, तसंच नगर रस्त्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद असणार आहे. भागा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या तातडीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली. ()
पुणे जिल्ह्यातील धरणं काठोकाठ भरल्याने आता पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंताही मिटली आहे. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याचा धोका टळला आहे. पाऊस आणखी काही दिवस सुरु राहणार असल्याने शेती आणि इतर कामांसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल.
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
मुळशी धरणात सध्या 94% पाणीसाठा असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीजगृहातून सरासरी 2000-2300 क्युसेक्स ने पश्चिमेकडे विसर्ग चालू केला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्याचा कल पाहता सांडव्यातून मुळा नदीमध्ये विसर्ग आवश्यकतेप्रमाणे आज अथवा उद्या सोडण्यात येईल.
यंदाचा गणेशोत्सव पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वर्दी देणार ठरला आहे. कारण येत्या काही दिवसांत पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजाणी होणार आहे. याविषयी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे येत्या दोन-तीन दिवसांत तशी घोषणा करु शकतात. एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची सूत्रांची माहिती आहे. 10 मार्च रोजी महापालिकेच्या मुख्य सभेत सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मंजूरी मिळाली नव्हती. मात्र, हा प्रस्ताव पूर्णत्त्वाला गेला असून लवकरच तशी घोषणा होऊ शकते.
ठाणे महापालिकेच्या पिसे येथील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेच्या पंपिंग मशिनरी बसविण्यात येणार आहे. तसेच इतर अत्यावश्यक कामेही करण्यात येणार आहे. त्यासाठी बुधवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते गुरुवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे महापालिकेचा स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.
इतर बातम्या :
‘लखोबा लोखंडे’चं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का?, रुपाली चाकणकरांचा सवाल
ठाण्यातील काही भागात येत्या बुधवारी पाणी पुरवठा बंद; ‘या’ भागात पाणी नाही