नागपूर : राज्यावर एकीकडे कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असताना मार्चमध्येच पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यात तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरातील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलं होतं. अशावेळी आता नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात 3 दिवस मॉडरेट हिट व्हेवचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं बनलं आहे. (3 days heat wave in some districts of Vidarbha including Nagpur)
राज्यात मार्च महिन्यातच उन्हाचे चटके अतिशय तीव्रतेने जाणवू लागले आहेत. विदर्भ, मराठवाडाच्या काही जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. कोकणातही तापमान वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी रत्नागिरीचं तापमानही 40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे. तिकडे नागपूरसह विदर्भात तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. आज आणि उद्या राज्यात पुन्हा तापमान वाढीची शक्यता नोंदवण्यात आली आहे. विदर्भ आणि विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यातील काही भागात तापमान वाढीचा अंदाज हवामान खात्याकडून नोंदवण्यात आलाय. काही शहरातील तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मार्च 30,31 दरम्यान विदर्भात व संलग्न मराठवाडा भागात तापमान वाढीची शक्यता, तापमान 42° च्या वर जाण्याची शक्यता.
IMD GFS Model guidance given below, Will update.. pic.twitter.com/c8a84OzzUs— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 28, 2021
अकोला – 42.8
अमरावती – 41.8
बुलडाणा – 40
ब्रम्हपुरी – 43.3
चंद्रपूर – 42.8
गडचिरोली – 38
गोंदिया – 40.8
नागपूर – 41.5
वर्धा – 42
वाशिम – 39.2
यवतमाळ – 42.5
Higher Tmax observed in Madhya Mah, Vidarbha and parts of Marathwada on 29 Mar:
Solapur 41.5 Malegaon 42 Jalgaon 41.5 Parbhani 41.1 Sangli 39.8 Nasik 39.1 Klp 39.5 A’bad 39.7 Pune 39.3
Osbad 39.8 Jalna 38.6 Baramati 38.8 Satara 38.9 Mumbai 34.6 Thane 37.2 Chandrapur/Akola 42.8 pic.twitter.com/GrEWYYn22f— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 29, 2021
संपूर्ण देशात तापमान वाढ नोंदवण्यात येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार काल दिल्लीत 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. होळी दिवशी म्हणजे 29 मार्चला 1976चं रेकॉर्डही तुटल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर दुसरीकडे 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान पूर्वोत्तर राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
3 days heat wave in some districts of Vidarbha including Nagpur