Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, पावसाळी वातावरण कधी संपणार? आयएमडीनं दिली माहिती

| Updated on: Dec 04, 2021 | 7:50 AM

अरबी समुद्रातील (Arabian Sea) कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण (Kokan) किनारपट्टीवरील चक्रवातामुळे राज्यात सध्या पाऊस हजेरी लावतो आहे

Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस, पावसाळी वातावरण कधी संपणार? आयएमडीनं दिली माहिती
Rain update
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) थांबण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील (Arabian Sea) कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण (Kokan) किनारपट्टीवरील चक्रवातामुळे राज्यात सध्या पाऊस हजेरी लावतो आहे. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असल्याने रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.

आजही हलक्या पावसाची शक्यता

शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. शनिवारीही या विभागांत हलक्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी सकाळी आणि रात्री धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होणार

आता अरबी समुद्रातील स्थिती निवळत आहे. त्याचप्रमाणे कुठेही नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही. त्यामुळे रविवापर्यंत राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे.

तापमानात घट

सध्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक आहे.

5 डिसेंबरनंतर कमाल तापमान सामान्य स्थितीत येणार

5 डिसेंबरपासून हवामान कोरडे झाल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाऊस

शुक्रवारी रात्री सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तर, पंढरपूर शहर व परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. सलग दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसानं सखल भागात पाणी साठलं आहे. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय.


इतर बातम्या:

जेलमधून संचित सुट्टीवर बाहेर, गावकऱ्याचं घर पेटवणाऱ्या तरुणाला तीन वर्ष सक्तमजुरी

सर्वांना सोबत घेत कारभार केला, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळावं, भाजप आमदाराची शरद पवारांसमोर इच्छा, सूत्रांची माहिती

weather Forecast low unseasonal rain predicted in Kokan and Central Maharashtra by IMD