मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्याच आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्यानंतर आता राज्यातील तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. (Maharashtra temperature increases unseasonal rain expected in some parts)
मुंबई आणि परिसरात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 2 अंशांनी, तर दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तब्बल 5 अंशांनी वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. सांताक्रुझ केंद्रावर रविवारी राज्यातील उच्चांकी 36.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर विदर्भाचा पारा यापूर्वीच वर गेला होता. विदर्भात सध्या कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 16 डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंदवण्यात आले आहे. तर मराठवाड्यातील तापमान सरासरीच्या आसपास आहे.
उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा आणि दक्षिणेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानात झपाट्याने बदल होत आहेत.
सांगली जिल्ह्यातील अनेक भागात काल रात्री वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा (Sangli Grapes Garden Destroyed) सह जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. सांगलीतही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या मुसळधार अवकाळी पावसामुळे तासगाव तालुक्यातील सावळज गावातील राहुल विष्णू माळी या शेतकऱ्यांची एक एकराची द्राक्ष बाग पडली आहे. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. या अवकाळी पासवामुळे हाता-तोंडाला आलेलं पीक बळीराजाच्या डोळ्यादेखत जमीन दोस्त झालं आहे.
सांगली जिल्ह्यातील अनेक भागात द्राक्ष बागांचे लाखो रुपयांच नुकसान झाले आहे. सावळजमध्ये तीन बागा पडल्या आहेत. काढणीला आलेल्या द्राक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी द्राक्ष बाग कोसळली आहे. तर, अनेक ठिकाणी द्राक्ष पिकांवर या पावसामुळे परिणाम झाला आहे.
संबंधित बातम्या –
Weather Alert : फेब्रुवारीच्या ‘या’ तारखांना राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा