हवामान खात्याने या राज्यांना दिला पुन्हा सतर्कतेचा इशारा; राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसणार पुराचा फटका

| Updated on: Sep 10, 2022 | 10:24 AM

हवामान खात्याकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारी असणाऱ्या जिल्ह्यांनाही जोरदार पाऊस होणार असून रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील काही गावांना मुसळधार पावसाचा फटका बसणार आहे. नाशिक जिल्ह्यात मागील शुक्रवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला होता.

हवामान खात्याने या राज्यांना दिला पुन्हा सतर्कतेचा इशारा; राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसणार पुराचा फटका
Follow us on

मुंबईः सध्या देशातील अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु असून येणाऱ्या पुढील काही दिवस अजून मुसळधार पावसामुळे पुरमयस्थिती निर्माण होणार असल्याचे हवामान खात्याकडून (Meteorological Department) सांगण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये 13 सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगितले गेले असून दिल्लीतील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड, दिल्लीसह महाराष्ट्रातही 13 तारखेपर्यंत प्रचंड पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

तर मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर झारखंड राज्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आाल आहे.

उत्तराखंडात मुसळधार

उत्तराखंड हवामान खात्याकडून आजपासून 13 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होणार असून 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.

डेहराडून, नैनीतालमध्ये अतिवृष्टी

10 तारखेला नैनीताल, चमोली आणि बागेश्वरमध्ये मुसळधार पाऊस होणार असून 11 तारखेला डेहराडून, नैनीताल आणि 12 तारखेला बागेश्वर, डेहराडून, नैनीतालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून 13 रोजी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रालाही सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात सध्या काही जिल्ह्यात पाऊस सुरू असून शनिवारी मात्र पुन्हा हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. उद्या पुणे आणि सातारा जिल्ह्यालाही जोरदार पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसणार आहे.

समुद्र किनारीपट्टीवर अतिवृष्टी

या बरोबरच हवामान खात्याकडून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारी असणाऱ्या जिल्ह्यांनाही जोरदार पाऊस होणार असून रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील काही गावांना मुसळधार पावसाचा फटका बसणार आहे. नाशिक जिल्ह्यात मागील शुक्रवारी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला होता.

नाशिकमध्येही पाऊस

नाशिक जिल्ह्यात एक दिवस आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचले होते. त्यामुळे शहरी भागात वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. त्याबरोबरच धरणांमधील पाण्याची पातळी वाढली होती. मुसळधार पावसामुळे परिसरातील धरणांच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढ झाली आहे.

मध्य प्रदेशातही पूर

मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील शहडोल, जबलपूर, नर्मदापुरम, चंबल या परिसरासह देवाल, उज्जैन, बुरहानपूर, खंडवा, खरगोन व बड़वाणी जिल्ह्यांना पावसाचा फटका बसणार आहे.

विजांसह पाऊस

विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 11 आणि 12 सप्टेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागातील नद्यांना पुराचा फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.