मुंबई : राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीचा उत्साह असतानाच अवकाळी पावसाने नागरिकांच्या आनंदावर विरजण टाकल्याचे चित्र आहे. राज्यात काल संध्याकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी रविवारी संध्याकाळीच पावसाला सुरुवात झाली. विदर्भात नंदूरबार, बुलढाणा आदी ठिकाणी कालच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर आज नाशिक, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच हलक्या सरी कोसळू लागल्यात. या अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
5 मार्च: पुढचे 4 दिवस, (5-8 मार्च) राज्यात काही ठिकाणी ढगाळ आकाश, गडगडाटासह पावसाची शक्यता.
? 7 मार्च, मराठवाडा विभागात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता.
IMD GFS model guidance for 4 days is here.
Watch for IMD updates … pic.twitter.com/VljUqYFdEN— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 5, 2023
अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 5 ते 8 मार्च दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, बुलढाणा, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण दिसून आले. तर अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. उद्या म्हणजेच ८ मार्चपर्यंत अशी स्थिती राहिल. त्यानंतर ढगाळ वातावरणी हळू हळू कमी होऊन पुन्हा एकदा ऊन चटकू लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.