रत्नागिरी: कोकण किनारपट्टी आणि मुंबईला झोडपून काढणाऱ्या तौक्ते चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची (Monsoon Rain) वाटचाल सुकर झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मान्सून नेहमीपेक्षा आधीच भारतात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार, येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होईल. त्यानंतर केरळमार्गे प्रवास करत मान्सूनच्या पावसाचे 8 जूनपर्यंत कोकणात आगमन होईल, असा अंदाज आहे. (Monsoon rain will come early in India due to tauktae cyclone)
सध्या बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नैऋत्येकडून वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी मान्सूनची वाटचाल अधिक वेगाने होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
तौक्ते चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही कोकण किनारपट्टीच्या परिसरात वाऱ्यांचा वेग अजूनही जास्तच आहे. या परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. अनेक भागात पावसाच्या सरी थोड्यावेळासाठी बरसून जात आहेत. आज दिवसभर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरु आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे
संबंधित बातम्या:
Monsoon Update | महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
Weather update : मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार!
Breaking | मान्सून येत्या शुक्रवारपर्यत अंदमानात, हवामान विभागाची माहिती
(Monsoon rain will come early in India due to tauktae cyclone)