यवतमाळ : विवाह सोहळा म्हटलं की, लाखोंचा खर्च, पाहुणे, बँड बाजा, जेवणावळी आल्याच. यामध्ये दोन्ही बाजूची मंडळी खर्च करतात. मात्र, ना बँड, ना बारात, ना जेवणावळी… यवतमाळमध्ये अवघ्या 135 रुपयात विवाह सोहळा पार पडला. जिल्ह्यात याच अनोख्या विवाहाची चर्चा पाहायला मिळतीय. हा अनोखा विवाह सोहळा यवतमाळमध्ये नोंदणी पद्धतीने पार पडला. (Wedding ceremony in Yavatmal for just Rs 135)
वधू मंगला संजय श्रीरामजिकर ही यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या अकोला बाजार कामठवाडा येथील रहिवासी आहे तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे दोघेही मूक बधिर आहेत. नातेवाईकांनी पुढाकार घेऊन हा विवाह प्रसंग जुळवून आणला.
विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना न बोलावता मुलाकडील आई वडील, काका, काकू आणि मुलीकडील आई वडील, बहीण, भाऊ एवढीच मोजकी मंडळी उपस्थित होती.
सर्व नातेवाईक नोंदणी कार्यालयात आले आणि केवळ135 रुपये खर्च करून आयुष्यभराच्या गाठी बांधल्या गेल्या. विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च न करता साध्या पध्दतीने कार्यक्रम पार पडू शकतो हे बोरकर आणि श्रीरामजीकर परिवाराने दाखवून दिले आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात कमी लोकांमध्ये विवाह सोहळे साजरे करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. या लग्नसोहळ्यातही कोरोनाचे सगळे नियम पाळून हा सोहळा संपन्न झाला. सगळ्या यवतमाळ जिल्ह्यात फक्त 135 रुपयांत लग्न, याचीच चर्चा होती.
(Wedding ceremony in Yavatmal for just Rs 135)
Photo : जगातील आश्चर्यचकित करणारे धबधबे, वाचा काय आहेत वैशिष्ट्ये https://t.co/Pb7xGJRRwl#Waterfalls #Amazingplaces #Travel
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 14, 2021
हे ही वाचा :
लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या मीशाला तीन वर्षाचा तुरुंगवास, तर पाकिस्तानी गायक अली जफरला दिलासा !
अमरावतीत शिवसेनेचा चक्क एमआयएमला पाठिंबा; नव्या भूमिकेने खळबळ!