Western Railway : मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई दरम्यानची परेची वाहतूक विस्कळीत

| Updated on: May 28, 2024 | 8:08 PM

पश्चिम रेल्वेच्या पालघर येथे यार्डात मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडी प्लेटची वाहतूक केली जात होती. या घटनेनंतर मालगाडीचा डबे उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे.

Western Railway : मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई दरम्यानची परेची वाहतूक विस्कळीत
Mumbai-Surat section affected after goods train derails in Palghar
Follow us on

पश्चिम रेल्वेच्या अप मार्गावर मुंबई आणि सुरत सेक्शनमध्ये एक मालगाडी मंगळवारी सायंकाळी 5.08 वाजताच्या दरम्यान घसरल्याची घटना घडली आहे. या मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडाची वाहतूक केली जात होती. ही घटना पालघर यार्ड लाईनमध्ये घडली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नसून मुंबई ते सुरत अप मार्गावरील वाहतूक सेवा कोलमडली आहे. या घटनास्थळावरील रुळांवरुन घसरलेले मालगाडीचे डबे उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. या अपघातानंतर अनेक गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केले आहे तर काही गाड्यांना वळविण्यात आले आहे.

येथे पाहा ट्वीट –

पश्चिम रेल्वेच्या मुंबई ते सुरत अप मार्गावर मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मालगाडी घसरल्याची घटना घडली आहे. या मालगाडीतून मोठ्या प्रमाणावर लोखंडाच्या प्लेट रोलची वाहतूक केली जात होती. मालगाडीचे डबे घसरल्याने त्या सोबत हे लोखंडाचे रोलही घसल्याने त्यांना घटनास्थळावरुन उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई ते सुरत अशा अप मार्ग या मालगाडीच्या डब्यांमुळे बाधित झाला आहे. पालघर यार्डात सायंकाळच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या संदर्भातील माहीती विचारली असता जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्या उलट या प्रतिनिधीलाच कुठे मालगाडी घसरली याची ? उलट माहीती विचारायला सुरुवात केली. पश्चिम रेल्वेच्या ट्वीटर हॅंडलवर अपघात होऊन दोन तास उलटले तरी कोणतीही माहीती पोस्ट करण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

असा झाला अपघात

पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरले आहेत. डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व रेल्वे वाहतूक सेवा त्यामुळे ठप्प झाली आहे. लोखंडी कॉइल घेऊन गुजरातवरून मुंबईच्या अप दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घसरले आहेत.  रुळावर मालगाडीचे डब्बे तीन डबे घसल्याने, दोन्ही रेल्वे रुळावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पालघर रेल्वेस्थानाकात एकूण चार रेल्वे मार्ग आहेत. सध्या मुंबई, विरारहून डहाणू, गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे. मात्र गुजरातवरून मुंबई, विरारकडे येणारी सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्व यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. यंत्रसामुग्री आणून घसरलेले डब्बे बाजूला करून  रेल्वे सेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

मालगाडीचे डबे घसल्यानंतर नंदूरबार, उधणा, आणि वांद्रे टर्मिनस आणि वलसाड येथून ART व्हॅन मागविली आहे.

12936 सुरत – मुंबई इंटरसिटीचा प्रवास वापी येथे थांबविला आहे. 16505 गांधीधाम – एसबीसी एक्सप्रेस, 12432 निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि 19260 भावनगर – कोचुवेली एक्सप्रेस व्हाया सुरत – उधणा – जळगाव – कल्याण वळविण्यात आली आहे.
उपनगरीय लोकल रद्द सहा अप आणि 5 डाऊन डहाणू लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. एक डाऊन डहाणू लोकल विरार येथे टर्मिनेट केली आहे.

खालील एक्सप्रेसचा प्रवास या स्थानकांवर समाप्त

1. 09160 वलसाड – वांद्रे टर्मिनस उंबरगाव रोड येथे

2. 09186 कानपूर – मुंबई सेंट्रल सचिन येथे

3. 09056 उधणा – वांद्रे टर्मिनस भिलाड येथे

4. 12936 सुरत – वांद्रे टर्मिनस वापी येथे

5. 19426 नंदूरबार – बोरीवली एक्सप्रेस वलडाड येथे

6. 19102 सुरत – विरार एक्सप्रेस बिलीमोरा येथे

7. 09180 सुरत – विरार उधणा येथे

हेल्पलाईन क्रमांक –

Vapi Station
0260 2462341

Surat Station
0261-2401797

Udhna Station
022-67641801