ज्या वेदांता आणि फॉक्सक्वान कंपनीवरुन राज्यातील राजकारण तापले आहे, ती कंपनी गुजरातमध्ये गेल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र ही कंपनी नेमकी आहे तरी काय असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. वेदांता कंपनी ही अमित अग्रवालांची असून तैवानची फॉक्सक्वान कंपनी मिळून वेदांता-फॉक्सक्वान कंपनी तयार झाली आहे. वेदांता ही कंपनी ही तेलापासून धातूची निर्मिती करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. तर फॉक्सक्वॉन कंपनी सेमिकंडक्टर बनवते. हीच कंपनी आयफोनचीसुद्धा निर्मिती करत असते. गाड्यांसाठी लागणारे सेमिकंडक्टर भारत चीनकडून आयात करत असते. वेदांता-फॉक्सक्वान कंपनीने तळेगावात प्रकल्पासाठी एक हजार एकर जागेची निवडही केली आहे. मात्र आता हा प्रकल्प कंपनीने अहमदाबादमध्ये घेऊन गेला आहे. पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प असून 160 छोटे उद्योग आणि जवळपास 1 लाख रोजगार निर्मिती या कंपनीच्या माध्यमातून होणार होती.