इतिहासाची पुनरावृत्ती, जे बाळासाहेबांनी म्हटले होते तेच शरद पवार यांनी सांगितले, अजित पवार यांना थेट तंबी

| Updated on: Jul 04, 2023 | 4:43 PM

राज ठाकरे यांनी मनसे पक्ष स्थान केला तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले होते. एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेब यांचे फोटो वापरले होते. राज ठाकरे यांना चुलते बाळासाहेब ठाकरे यांनी आपले फोटो वापरण्यास मनाई केली होती. त्या इतिहासाची आज पुनरावृत्ती झाली.

इतिहासाची पुनरावृत्ती, जे बाळासाहेबांनी म्हटले होते तेच शरद पवार यांनी सांगितले, अजित पवार यांना थेट तंबी
BALASAHEB AND SHARAD PAWAR
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची घोषणा केली. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह आणि त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरण्यास सुरवात केली होती. यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना खडसावले होते. मी जिवंत असताना माझे फोटो वापरू नका असे आदेश त्यांनी राज ठाकरे यांना दिले होते. तर, शिवसेनेमध्ये बंड करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे गटानेही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी माझ्या वडिलांचे फोटो लावू नका अशा शब्दात शिंदे गटाला खडसावले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे. अजित पवार यांनी शरद पवार याना न कळवता उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली आहे. यावरून शरद पवार यांनी अजित पवार यांना थेट वॉर्निंग दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा माझा पक्ष आहे. त्यामुळे मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. ज्यांचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये असे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहे. त्यांनी माझे फोटो वापरू नये. जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा असे शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार आज काँगेसच्या नेत्यांनी भेट घेतली आहे. यशवंतराव चव्हाण येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. कुणाल पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, माजी आ. राहुल बोंद्रे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी कॉंग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.

महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे. काही लोकांना ईडी सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपाचे नाही ऐकले तर जेलमध्ये जावे लागेल या भितीतून हे सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरु आहे ते दुःखद आहे. भूषणावह नाही अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.