नाशिक : काही कार्यक्रम असे असतात की त्यातील घडामोडी या नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामध्ये जर काही राजकीय व्यक्ती ( Political News ) असतील तर मग त्याची जोरदार चर्चा होत असते. असाच एक प्रसंग नाशिकच्या दिंडोरी ( Nashik Dindori ) तालुक्यात घडला आहे. ज्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या उपस्थित शुक्रवारी कादवा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन पार पडले. याच दरम्यान सुधीर तांबे आणि शरद पवार यांच्याबाबतीत हा प्रसंग घडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अधिकच चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटनाच्या कोनशिलाचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी राजकारणातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.
यामध्ये शरद पवार, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ याशिवाय जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील नेते उपस्थित होते. याच दरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अधिक चर्चेत राहिलेले सुधीर तांबे उपस्थित होते.
डिस्टीलरी इथेनॉल प्रकल्पाचे कोनशिलाचे अनावरण सोहळ्याच्या प्रसंगी फोटो सेशन सुरू होते. त्याच दरम्यान अरे त्या तांबेंना घ्या पुढे अशी हाक मारत इतर पदाधिकाऱ्यांना सूचना केली. यावेळी सर्वच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार यांचे विधान होताच माजी आमदार सुधीर तांबे यांनी हात जोडले. याच दरम्यान काही क्षणातच राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी तांबेना उद्देशून एक विधान केले, त्यानंतर जोरदार हास्यकल्लोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
तांबेंना पुढे काढून दिलंय आम्ही सगळ्यांनी असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी म्हंटलं होतं. हा प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात असतांना निवडणुकीतील चर्चा पुन्हा होऊ लागल्या आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत दर दिवसाला नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळाले. त्यामध्ये नुकताच शरद पवार यांनी सुधीर तांबे यांच्या बद्दल विधान करणे आणि त्यावर तांबे यांनी हात जोडणे आणि लागलीच कोकाटे यांनी कॉमेंट करणे चर्चेचा विषय झाला आहे.
त्यामुळे निवडणुकीत सत्यजित तांबे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. त्यातच महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांनी सुधीर तांबे यांना लक्ष केले होते. त्यामुळे पवार तांबे यांचा प्रसंग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.