मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आयएनएस विक्रांत (vikrant) प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र आणि देशाची फसवणूक करणारे दोन ठग कुठे आहेत? हा मोठा सवाल आहे. भाजपकडून या दोघांची माहिती का दिली जात नाही? त्यांना कुठे लपवले आहे? हे दोघेही बापबेटे महाराष्ट्राच्या बाहेर असल्याची मला पक्की शंका आहे. त्यांना कोणत्या राज्यात लपवलं आहे. हे दोघेही केंद्रातून अंतरिम बेलची सेटिंग करत असल्याची मला भीती आहे. पण त्यांची सेटिंग होणार नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या आणि त्यांचा मुलगा गायब आहे. त्यामुळे त्यांच्यावर लुक आऊट नोटीस जारी केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.
मेहुल चोकसी आणि किरीट सोमय्यांचं जुनं नातं आहे. त्यामुळे सोमय्या मेहुल चोक्सीकडे अँटिगुवामध्ये तर पळून गेले नाही? अंतरीम बेलसाठी सोमय्या यांची केंद्रातून सेटिंग सुरू आहे. पण त्यात ते यशस्वी होणार नाही, असं सांगतानाच माझ्या मते पोलीस चौकशी करत आहेत. सत्याचा विजय होईल. दोन लफंगे कुठे आहेत. ते देशाबाहेर पळून जाण्याची भीती वाटते, असं राऊत म्हणाले.
मी जे बोलतो तो व्यक्तीगत आरोप नसून लोक भावना आहे. देशभावना आहे. त्यामुळे माझा आत्मा तिळ तिळ तुटतोय. पवारांच्या घरी ते स्वत होते त्यांची पत्नी आणि नातवंडं होते. अशावेळी त्यांच्या घरावर हल्ल्याचं षडयंत्र दुर्भाग्यपूर्ण आहे. पोलीस त्याची चौकशी करतील. सेव्ह विक्रांतच्या प्रचंड पैसा जमा करण्यात आला आहे. तो काही छोटा घोटाळा नाहीये. त्याची व्याप्ती मोठी आहे. पूर्ण महाराष्ट्रातून पैसा गोळा करण्यात आला. बापबेट्यांनी ही वसुली केली. त्यांची माफिया टोळी आहे. बिल्डरांकडूनही ते पैसे जमा करतात. इतर राज्यातूनही पैसा गोळा केला. या पैशाचा दुरुपयोग झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरही भाष्य केलं. पवारांच्या घरावर हल्ला झाला हे चुकीचं आहे. या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार शोधला पाहिजे. हल्लेखोरांना माफी देऊ नये, असंही राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
भोंग्यावरून मनसेमधली खदखद तीव्र; आता धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांचा राजीनामा