लातूर : कुणाचे स्टार कुणामुळे चमकतील हे सांगता येत नाही. असाच काहीसा किस्सा मूळचे (Latur) लातूरचे असलेले (Pradeep Gawande) प्रदीप गावंडे यांच्या बाबतीत होताना पाहवयास मिळत आहे. (Teena Dabi) टीना डाबी ह्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या परिक्षेत भारताततून पहिल्या आल्या होत्या तर त्याच वर्षी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अतहर आमीर यांच्याशी त्या विवाहबध्द झाल्या होत्या. ह्या एका लग्नाची गोष्टीची चर्चा सोशल मिडियावर तुफान झाली होती. तर आता याच टीना डाबी यांच्याशी प्रदीप गावंडे यांचा विवाह होणार आहे. आयएएस झाल्यानंतरही जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी आता प्रदीप गावंडे यांना मिळालेली आहे. ह्या त्यांच्या लग्नाबद्दल टीना डाबी यांनीच इंस्टाग्रमवर ही माहिती दिली आहे. अतहर खान यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर टीना डाबी आणि आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांचा साखरपुडा झाला आहे. यानंतरच डॉ. प्रदीप हे नेमके कोण आहेत याची उत्सुकता सर्वानाच लागली होती. तर प्रदीप गावंडे हे मूळचे लातूरचे असून त्यांनी वैद्यकीय शिक्षण हे औरंगाबादमध्ये पूर्ण केले आहे.
41 वर्षाीय प्रदीप गावंडे हे टीना डाबी यांच्याशी विवाहबद्ध होणार असल्याचे समोर येताच त्यांच्याविषयी अनेकांनी जाणून घेण्य़ाचा प्रयत्न केला आहे. प्रदीप गावंडे हे मूळचे लातूरकर आहेत. त्यांचा जन्मही लातूर शहरातच झाला होता. एवढेच नाही तर इयत्ता 12 वी पर्यंत त्यांनी लातूरातील राजश्री शाहू महाविद्यालयात विज्ञान या शाखेतून शिक्षण पूर्ण केले.तर पुढील वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालयातून पूर्ण केले होते. यानंतर 2013 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली असून ते आता राजस्थानात केडरचे अधिकारी म्हणून सनदी सेवेत आहेत. दरम्यानच्या काळात अनेक सिनियर्सकडून प्रेरणा मिळाल्यानेच हे यश मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
प्रदीप गावंडे यांच्यासह त्यांच्या भावडांना शिक्षणाचे धडे हे घरातूनच मिळाले आहेत. कारण आई सत्यभामा केशवराव गावंडे ह्या शिक्षिका होत्या तर वडिल हे युनियन बॅंकेत अधिकारी होते. प्रदीप गावंडे यांचे मोठे बंधू हेमंत गावंडे हे देखील डॉक्टरच. ते औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. त्यांची लहान बहीणही एमबीबीएस डॉक्टर आहे.
कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवदान देत असतानाच डॉ. प्रदीप गावंडे आणि टीना डाबी यांची प्रेम कहाणी बहरली. त्याचे झाले असे 2021 मध्ये कोरोनाच्या लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वितरणाची जबाबदारी ही त्यांच्यावकर होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे हताळलीच पण याच काळात एकमेकांशी त्यांची ओळखही झाली. टीना डाबी यांचा विनम्र स्वभाव आणि दयाळूपणा मनाला भावल्याचे गावंडे यांनी सांगितले आहे.
पुढील महिन्यात डॉ.प्रदीप गावंडे आणि टीना डाबी हे विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र, यापूर्वी अनेक अफवाही सोशल मिडियातून पसरल्या होत्या. यामध्ये टीना डाबी यांचा अतहर खान यांच्यासोबत घटस्फोट तर झालाच आहे पण प्रदीप गावंडे यांचे देखील हे दुसरे लग्न असल्याची अफवा होती. पण एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गावंडे यांनी या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सांगितले आहे. ते राजस्थानात कर्तव्य बजावत असून 22 एप्रिल रोजी राजस्थानातच विवाह करणार आहेत. नातेवाईक हे मराठवाडा आणि पुणे, मुंबई याच भागात असल्याने 24 एप्रिल रोजी पुण्यात रिसेप्शन दिले जाणार आहे.
इंजिनिअरिंगच्या 10 अभ्यासक्रमांसाठी गणित वैकल्पिक होणार, AICTE चा मोठा निर्णय