काँग्रेसच्या तरुण आमदारांना कुणाचं हवंय नेतृत्व ? काय आहे त्यांची मागणी ?

| Updated on: Apr 13, 2023 | 4:41 PM

महाविकास आघाडी होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणूका आघाडी म्हणून एकत्र लढत. त्यावेळी जागावाटपाचा फॉर्म्युला २६ - २२ किंवा २७ - २१ असा होता. या फॉर्म्युल्यात मोठा हिस्सा हा काँग्रेसचा असायचा.

काँग्रेसच्या तरुण आमदारांना कुणाचं हवंय नेतृत्व ? काय आहे त्यांची मागणी ?
MAHAVIKAS AGHADI LEADER
Follow us on

मुंबई : राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) यांची महाविकास आघाडी झाली. महाविकास आघाडीच्या सत्तेमध्ये काँग्रेसलाही मोठा वाटा मिळाला होता. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात यश मिळाले. भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर आणि अमरावती या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या. पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ ही पारंपरिक जागाही पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी जिंकली. हे तिन्ही भाजपने बालेकिल्ले होते. काँग्रेसच्या या यशामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) यांचाही महत्वाचा सहभाग आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वाढत्या जवळकीमुळे काँग्रेसमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. त्यातच काँग्रेसच्या तरुण आमदारांनी थेट हायकमांडला साकडे घातले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काँग्रेसपासून दुरावले. युवक प्रदेश अध्यक्ष असताना सत्यजित तांबे यांचा काँग्रेसच्या तरुण नेत्यासमवेत उत्तम संपर्क होता. त्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यामधीलही दुरावा वाढला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेते नाराज आहेत. महाविकास आघाडीमधील नेत्यांसोबतही त्यांचे अधूनमधून खटके उडत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) यांच्यामध्ये जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेसला डावलून दोन वेळा बैठका झाल्या. महाविकास आघाडी होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणूका आघाडी म्हणून एकत्र लढत. त्यावेळी जागावाटपाचा फॉर्म्युला २६ – २२ किंवा २७ – २१ असा होता. या फॉर्म्युल्यात मोठा हिस्सा हा काँग्रेसचा असायचा.

उद्धव ठाकरे यांच्या आघाडीतील प्रवेशानंतर आता पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. मात्र, पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ चार खासदार उरले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण आहे. त्याचा फायदा घेऊन उद्धव ठाकरे हे अधिक जागा मागू शकतात अशी शक्यता काँगेसला वाटत आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तरुण आमदार यांनी या घडामोडींवर लक्ष देतानाच थेट हायकमांडला पात्र लिहिले आहे. यात चार माजी मंत्री आणि तीन आमदार यांच्यासह या तरुण आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत बोलणी करण्यासाठी पॅनल तयार करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष यांना द्यावेत अशी विनंती केली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकणे काँग्रेससाठी खूप महत्त्वाचे आहे. राज्यात महाविकास आघाडीला परिस्थिती खूप अनुकूल आहे. महाराष्ट्रात मविआचे जास्त खासदार निवडून आल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. महाविकास आघाडीचे जागा लवकर वाटप झाल्यास त्यादृष्टीने तयारीला लागता येईल. काँग्रेस नेतृत्वाने झपाट्याने हालचाल केली तर महाराष्ट्र हे प्रमुख राज्य म्हणून बदलेल, असे या तरुण नेत्यांनी हायकमांडला कळविले आहे.

लोक आम्हाला मत द्यायला तयार आहेत. फक्त, त्यांच्यापुढे शिस्तबद्ध शक्ती म्हणून जाण्याची गरज आहे. युतीची किंवा जागावाटपाची चर्चा उशीरा झाल्यास त्याचा परिणाम प्रचारावर आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होतो. पक्षाची आधीच स्थिती बिघडली आहे त्यामुळे उशीर झाल्यास ही परिस्थिती आणखीनच क्षीण होईल. जागावाटपात आपल्यास कमी जागा मिळतील, अशी भीतीही त्यांनी हाय कमांडकडे व्यक्त केली आहे.