लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकारला महाविकास आघाडीपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यातच आता विधानसभेची निवडणूका तोंडावर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने आज एकत्र पत्रकार परिषद घेत आम्ही एकत्र असून विधानसभेच्या निवडणूकाही एकत्रच लढणार असल्याचे स्पष्ट केले. आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मराठी माणसांची मते मिळाली नाहीत असा आरोप केला होता. त्यास देखील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकात मोठे यश मिळाले आहे. तर महायुतीला विदर्भासह अनेक भागात मोठे अपयश आले आहे. या निवडणूकीत भाजपाची मतांची टक्केवारी अत्यंत चांगली आहे. महाविकास आघाडीने खोटे नॅरेटीव्ह केल्याने त्यांना मुस्लीमांची मते मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, तर उद्धव ठाकरे यांना मराठी मते मिळालेली नाहीत असाही दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसला 13 जागा मिळाल्याने आता मोठा भाऊ आम्ही आहोत असा दावा कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मराठी मते मिळाली नाहीत या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर ठाकरे यांनी उलट सवाल करीत म्हटले आम्हाला मराठी मते का कमी मिळतील ? असं काय कारण आहे. ‘एम’ म्हणजे मराठी नाही. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. हिंदू मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांनी मत दिलं असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘रक्त सांडवून मिळवलेली मुंबई लुटली जात असेल तर लुटारूंना मराठी माणूस मतदान करेल का ? मराठी माणूस झोपेतही भाजपला मतदान करणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच वास्तवाची जाणीव भाजपला आली नसेल तर त्यांनी निवडणुकीच्या विस्तवाला सामोरे जावे लागेल असे ठाकरे यावेळी म्हणाले. आता प्रश्न त्यांच्याकडेही आहे. मी मुख्यमंत्री असताना वसली तीन गावं एक वसेची ना असं फडणवीस म्हणाले होते. आता हालत बेकार आहे. एकही गाव वसत नाही. तिन्हीचे तिन्ही ओसाड आहेत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी महायुतींच्या नेत्यांवर केली.