पहिल्या पत्नीला जास्त वेळ देतो म्हणून दुसऱ्या पत्नीचं भयानक कांड, पतीनं गमावला जीव, नाशिक हादरलं

| Updated on: Jan 20, 2025 | 6:31 PM

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती आपल्या पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहातो, म्हणून दुसऱ्या पत्नीनं पतीची हत्या केली आहे.

पहिल्या पत्नीला जास्त वेळ देतो म्हणून दुसऱ्या पत्नीचं भयानक कांड, पतीनं गमावला जीव, नाशिक हादरलं
Follow us on

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती आपल्या पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहातो, म्हणून दुसऱ्या पत्नीनं पतीची हत्या केली आहे. आडगाव – सय्यद पिंप्री रस्त्यावरील एका वस्तीवर हा प्रकार घडला आहे, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दुसऱ्या पत्नीनं आपल्या पतीला दोन सख्ख्या भावांच्या मदतीनं बेदम मारहाण केली, त्यानंतर धारदार शस्त्रानं वार करून पतीचा खून केला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातल्या आडगाव- सय्यद पिंप्री रस्त्यावरील एका वस्तीवर एक खेळणी विक्रेत्याचं कुटुंब वास्तव्याला आहे. भावसार मूलचंद पवार ऊर्फ बाल्या असं या हत्या झालेल्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे. मूलबाळ होत नाही, तसेच आपला पती हा त्याच्या पहिल्या पत्नीला जास्त वेळ देतो, तिच्याकडे जास्त काळ राहातो या रागातून दुसऱ्या पत्नीनं आपल्या दोन सख्खा भावाच्या मदतीनं पतीची हत्या केली.  पत्नी सुनीता, तिचे भाऊ राज शिंदे, आदित्य शिंदे (दोघे रा. हिंदुस्थाननगर, आडगाव), तसेच दीपक आणि आणखी एक व्यक्ती अशी या प्रकरणातील संशयित आरोपींची नावं आहेत.

भावसार मूलचंद पवार ऊर्फ बाल्याची दुसरी पत्नी सुनीता हिने आपला पती पहिल्या पत्नीकडे जास्तवेळ राहातो.  म्हणून आपल्या दोन सख्ख्या भावांच्या मदतीनं पतीला बेदम मारहाण केली, त्यानंतर त्याचा धारदार शस्त्रान खून करण्यात आला.

भावसार याची पहिली पत्नी निरमा पवार (वय ३०) हिने याबाबत फिर्याद दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भावसारची दुसरी पत्नी सुनीता आणि भावसार याचे सकाळपासून भांडण सुरू होते. मुलबाळ होत नाही, तो त्याच्या पहिल्याच पत्नीकडे अधिकवेळ राहातो म्हणून त्यांचे भांडण सुरू होते. या भांडणात सुनीताचे भाऊ देखील तिची साथ देत होते. मात्र सायंकळाच्या वेळी अचानक भावसार याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी भावसारची पहिली पत्नी निरमा आणि तिच्या कुटुंबानं  तिकडे धाव घेतली तर त्याला बेदम मारहाण सुरू होती, त्यानंतर त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, संशयित पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे.