महेश पवार, मुंबई | 24 फेब्रुवारी 2024 : राज्यातल्या बदललेल्या समीकरणात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरली होती. वंचितमुळे महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. 8 ते 9 मतदारसंघात वंचितने घेतलेल्या मतांमुळे काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम (AIMIM) यांनी एकत्र येऊन ही वंचित बहुजन आघाडी तयार केली होती. वंचितने निवडणुकीत 14 टक्के मते मिळवून आपली ताकद दाखवून दिली होती. इतकंच नव्हे तर औरंगाबादची जागाही खेचून आणली.
गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला बसलेला हा मोठा धक्का होता. नेमकी हीच बाब हेरून उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांचा मैत्रीचा हात हातात घेतला. तर, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस यांच्या आघाडीनेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणी सुरु केली आहे. वंचितला सोबत न घेतल्याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसला. त्यामुळेच 48 पैकी केवळ एकच जागा कॉंग्रसला मिळवता आली.
गेल्यावेळी झालेली चूक सुधारून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचितला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे भाजपला मोठा फटका बसणार आहे. गेल्या निवडणुकीत जर कॉंग्रेस आणि वंचित याची आघाडी झाली असती तर भाजप आणि शिवसेनेच्या आणखी काही जागा कमी झाल्या असत्या. वंचित सोबत आल्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भाजपची शक्ती वाढली आहे.
2019 च्या लोकसभेत वंचितने तब्बल 41 लाख मते घेतली. राष्ट्रवादीसाठी ही व्होटबॅंक पूरक होती. पण, वंचितने ही मते घेतली. राज्यातल्या एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 39 ठिकाणावर वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे राष्ट्रवादीला जवळपास 11 जागा गमवाव्या लागल्या असा दावा राष्ट्रवादीने केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले नाही. त्यामुळे वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे केले. वंचितच्या 15 उमेदवारांनी साधारण 90 हजार ते 3 लाखांपर्यंत मते मिळवली आणि तीच मते कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पराभवाला कारणीभूत ठरली. ते मतदारसंघ कोणते ते पाहू.
वंचित आणि एमआयएम यांची आघाडी होती. या आघाडीला लोकसभेत जिंकता आलेली एकमेव जागा म्हणजे औरंगाबाद लोकसभा. येथे एमआयएमचे इम्तियाज जलिल हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि कॉंग्रेसचे सुभाष झांबड यांचा पराभव केला.
भाजप : संजयकाका पाटील – 5 लाख 08 हजार 995 मते ( विजयी )
काँग्रेस : विशाल प्रकाशबापू पाटील – 3 लाख 44 हजार 643 मते
वंचित : गोपीचंद पडळकर – 3 लाख 00234 मते
कॉंग्रेस आणि वंचित एकूण मते : 6,44, 877
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 1,35,882
भाजप : अशोक महादेवराव नेते – 5 लाख 19 हजार 968 (विजयी)
कॉंग्रेस : डॉ. नामदेव उसेंडी – 4 लाख 42 हजार 442 मते
वंचित : रमेश गजबे – 1 लाख 11 हजार 468 मते
कॉंग्रेस आणि वंचित एकूण मते : 5,53,910
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 33,942
भाजप : प्रतापराव पाटील चिखलीकर – 4 लाख 86 हजार 806 मते (विजयी)
कॉंग्रेस : अशोक शंकरराव चव्हाण – 4 लाख 46 हजार 658 मते
वंचित : यशपाल भिंगे – 1 लाख 66 हजार 196 मते
कॉंग्रेस आणि वंचित एकूण मते : 6,12,854
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 1.26,048
भाजप : डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य – 5 लाख 24 हजार 985 (विजयी)
कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे – 3 लाख 66 हजार 377 मते
वंचित : बाळासाहेब आंबेडकर – 1 लाख 70 हजार 7 मते
कॉंग्रेस आणि वंचित एकूण मते : 5,36,384
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 11,399
शिवसेना : प्रतापराव गणपतराव जाधव – 5 लाख 21 हजार 977 (विजयी)
काँग्रेस : डॉ. राजेंद्र शिंगणे – 3 लाख 88 हजार 690 मते
वंचित : बळीराम सिरस्कार – 1 लाख 72 हजार 627 मते
कॉंग्रेस आणि वंचित एकूण मते : 5,61,317
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 39,340
शिवसेना : धैर्यशील माने – 5 लाख 85 हजार 776 (विजयी)
स्वाभिमान : राजू शेट्टी – 4 लाख 89 हजार 737 मते
वंचित : अस्लम सय्यद – 1 लाख 23 हजार 419 मते
कॉंग्रेस आणि वंचित एकूण मते : 6,13,156
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 27,380
शिवसेना : संजय हरिभाऊ जाधव – 5 लाख 38 हजार 941 (विजयी)
कॉंग्रेस : राजेश उत्तमराव विटेकर – 4 लाख 96 हजार 742 मते
वंचित : आलमगीर खान – 1 लाख 49 हजार 946 मते
कॉंग्रेस आणि वंचित एकूण मते : 4,64,688
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 1,07,747
अपक्ष : नवनीत कौर राणा – 5 लाख 10 हजार 947 (विजयी)
शिवसेना : आनंदराव अडसूळ – 4 लाख 73 हजार 996 मते
वंचित : गुणवंत देवपारे – 65 हजार 135 मते
अपक्ष आणि वंचित एकूण मते : 5,39,131
विजयी उमेदवारांच्या मतांचा फरक : 28,184