पालघरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनं खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या विरारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विरार फाट्याच्या पिरकुंडा दर्गाजवळ एका ओसाड ठिकाणी महिलेचे सुटकेस मध्ये मुंडके आढळले आहे. तेथील स्थानिक मुलांनी ही सुटकेस उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. होळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ते सुटकेसमध्ये घालून आरोपींनी त्याची विल्हेवाट लावल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या कलिना येथून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी रवाना झाली असून, अधिक तपास सुरू आहे. मांडवी पोलीस या हत्येचा तपास करत असून, हा गुन्हा कोणी आणि कोणत्या कारणाने केला याचा शोध घेत आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विरारमध्ये ही हादरवणारी घटना घडली आहे. विरार फाट्याच्या पिरकुंडा दर्गाजवळ स्थानिक मुलांना ही सुटकेस सापडली, त्यांनी उत्सुकतेपोटी ती उघडली असता त्यामध्ये महिलेचं धडावेगळं केलेलं मुंडकं आढळून आलं आहे. या घटनेमुळे त्यांनाही मोठा धक्का बसला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासानुसार, सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजूनही तिची पूर्ण ओळख समोर आलेली नाहीये. या महिलेची अत्यंत क्रूर अशा पद्धतीनं हत्या करण्यात आली आहे. तीचं मुंडकं पोलिसांना मिळालं आहे, आता इतर अवयव आरोपींनी कुठे टाकले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी का आणि कशासाठी करण्यात आली हे अद्याप अस्पष्ट आहे.