Atal Setu : बापरे ! कारमधून उतरली अन् जीव देण्यासाठी मारली उडी, केसांमुळे जीव वाचला; कॅब ड्रायव्हरने थेट ..!

| Updated on: Aug 17, 2024 | 8:26 AM

मुंबईतील अटल सेतूवरून गेल्या काही महिन्यात अनेक लोकांनी जीव देण्याचा प्रयत्न केला आहे, काहींनी आयुष्य संपवलंही. असाच एक थरारक प्रकार नुकताच समोर आला आहे, तेथे एका महिलेने या उड्डाणपुलाववरून उडी मारत टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय, पण केसांमुळे तिचा जीव वाचला.

Atal Setu : बापरे ! कारमधून उतरली अन् जीव देण्यासाठी मारली उडी, केसांमुळे जीव वाचला; कॅब ड्रायव्हरने थेट ..!
Image Credit source: social media
Follow us on

सोशल मीडियावर सतत वेगवेगळे, काही थराराक व्हिडीओज शेअर होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ पाहून हादरायला होतं तर काहींमुळे आपण अवाक् होतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत असून तो मुंबईतीलच आहे. येथील अटल सेतू पुलाचे काही काळापूर्वी मोठ्या जल्लोषात उद्घाटन झाले होते, मात्र त्यात अटल सेतू पुलावरून उडी मारून एका महिलेने तिचा जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या केसांमुळे आणि तेथील कॅब ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव बचावला. त्याने तिला पकडू ठेवलं, तेवढ्यात काही सेकंदातच पोलिसांचे पथकही तेथे पोहोचले आणि त्यांनी रेलिंगवर चढून, जीव धोक्यात टाकत, प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या महिलेला अखेर वाचवलं. याच घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून त्याचीच चर्चा सुरू आहे.

कॅब थांबवली आणि रेलिंगच्या पलीकडे गेली..

मुंबईतील अटल सेतूवरून उडी मारून जीव देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घ़डल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीच दादरमधील एका डॉक्टरने तसेच त्यानंतर एका बिझनेसमननेदेखील अटल सेतूवरून उडी मारून आयुष्य संपवलं होतं. तशीच एक घटना मुंबईत शुक्रवारी पुन्हा घडली. याच थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो पाहूनच हादरायला होतं.

कॅब ड्रायव्हरने केस पकडून रोखलं नाहीतर..

मिळलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचे नाव रीमा पटेल असून ती 56 वर्षांची आहे. रीमा ही मुलुंड येथील रहिवासी आहे. शुक्रवारी तिने कॅब बूक केली आणि अटल सेतूवर पोहोचल्यावर ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. त्यानंतर उतरून ती रेलिंगच्या पलीकडे जाऊन उभी राहिली, मात्र हाँ प्रकार बघताच कॅबचालही उतरला आणि प्रसंगावधान राखत त्याने महिलेला धरून ठेवले. अटल सेतूवर ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने, कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांना ती महिला दिसली आणि त्यांनी तातडीने पेट्रोलिंग टीमला सूचना दिली. सूचना मिळताच लगेचच चार कर्मचाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. त्या अधिकाऱ्यांची कार तेथे पोहोचताच त्या महिलेने समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला. पण तेथे उभ्या असलेल्या कॅब ड्रायव्हरने लगेच तिच्या केस पकडून तिला धरून ठेवले अन् तिचा हातही पकडला.

 

त्यानंतर गाडीतून उतरून 4 ते 5 पोलिसांनी धाव घेत त्या महिलेला कसेबसे वर खेचून तिचे प्राण वाचवले. महिलेला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यासाठी ते अधिकारी स्वत: रेलिंगवर चढले होते आणि त्यांनी स्वत:चा जीवही धोक्यात टाकला. मात्र त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या महिलेला वाचवलं. त्यांच्या या शौर्याचे कौतुक केले जात आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवलेत.