यवतमाळ : 608 ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Election) आज मतदान होतंय. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतींसाठी रविवार आज मतदान होतंय. यवतमाळच्या बाभूळगाव 1, कळंब 2, आर्णी 4, महागाव 1, घाटंजी 6, केळापूर 25, मारेगाव 11, झरी 8 तर राळेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. 70 सरपंचपदासाठी 261 तर सदस्यपदासाठी एक हजार 31 उमेदवार रिंगणात आहे. आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. या निवडणुकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढविणारे उमेदवार आणि सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.