यवतमाळ : खासदार संजय राऊत हे मुंगेरीलाल आणि गणपत वाणी यांचे वंशज आहेत, अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. जनतेनी 2019 मध्ये भाजप आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीला निवडून दिले आहे. जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झिडकारले आहेत. महाराष्ट्रात आणि देशात त्यांची सत्ता होती. मात्र कुठलाही विकास त्यांनी केला नाही. गरिबी हटू शकली नाही. ते साधे स्वच्छतागृह देऊ शकले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनी परमनंट सुटी दिलेली आहे. त्यांच्या आधारावर जर संजय राऊत फेब्रुवारी महिन्यात आमची सत्ता येईल, असं म्हणत असेल तर हे गणपत वाणी आणि मुंगेरीलाल यांचे वंशज संजय राऊत यांचा रूपाने पहावयास मिळते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्र द्रोही असेल की देशद्रोही असेल यांच्यावर चालं केलीच पाहिजे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? हे त्यांना माहीत नाही. अश्या महाराष्ट्र द्रोही व देशद्रोही यांना जनतेने शिक्षा दिलीच पाहिजे.
महाविकास आघाडी सरकारने अफजल खानाची कबर अधिकृत करण्याची बैठक घेतली. पण आमच्या सरकारनं हे अतिक्रमण हटविले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचे नाटक केले. पण आम्ही ते नाव दिले. म्हणून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असंही मुनगंटीवार यांनी सुनावलं.
हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे बोर्ड भगव्या वरून हिरवे केले. प्रभू रामचंद्राला शिवा देणाऱ्यांना आता तुमच्या पक्षात मानसन्मान दिला जात असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेना यांच्यावर केला.
शिवसेनेच्या नेत्यांनी प्रभू राचंद्राची निंदा नालस्ती केली. भगवान कृष्ण यांच्या पवित्र संबंधाबाबात निंदनीय वक्तव्य केलं. त्यामुळं पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन जय श्रीराम म्हणावं तरचं महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांना माफ करेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.