यवतमाळ : कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्या (Farmer)ने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नेर तालुक्यातील मालखेड बुद्रुक येथे घडली आहे. प्रकाश उत्तम मानकर (54) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सततच्या नापिकीपणामुळे बँकेचे कर्ज वाढतच होते. यामुळे शेतकरी मानकर हे नैराश्येत होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी नेर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. (Farmer commits suicide by hanging himself after getting fed up with bank loan)
प्रकाश मानकर यांच्याकडे 10 एकर शेती आहे. या शेतीसाठी मानकर यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या उत्तर वाढोना शाखेतून कर्ज घेतले होते. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि नापिकीमुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच होता. यामुळे मानकर सतत चिंतेत असायचे. याच विवंचनेतून मानकर यांनी रविवारी सकाळी आपला भाऊ पुरुषोत्तम मानकर यांच्या शेतामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी सदर शेतामध्ये धाव घेतली. यानंतर नेर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मानकर यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे.
पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात घडली आहे. दुर्गा मुकेश टांगले असे मयत महिलेचे नाव आहे. दुर्गाच्या पतीला दारुचे व्यसन होते. त्यामुळे दारुच्या नशेत तो दररोज पत्नीला मारहाण करीत असे. याच मारहाणीला कंटाळून दुर्गाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुर्गा कामाल जाते सांगून घरातून निघून गेली. मात्र संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर रविवारी सकाळी तिचा मृतदेह एका विहिरीत तरंगताना आढळून आला. (Farmer commits suicide by hanging himself after getting fed up with bank loan)
इतर बातम्या
Bhandara Suicide : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या
दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये मृत्यूचा शिमगा, 25 जणांचा मृत्यू, आकडा आणखी वाढण्याची भीती