यवतमाळ : पोलीस स्टेशन म्हटले तर तिथं बोटावर मोजता येईल एवढ्या महिला कर्मचारी आणि पुरुष मंडळींचा राबता पाहायला मिळतो. आता मात्र यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्याचा (Lohara Police Station) कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील (Superintendent of Police Dilip Bhujbal Patil) यांनी दिला आहे. राज्यातील पाहिले महिला पोलीस स्टेशन म्हणून लोहारा पोलीस ठाण्याची ओळख आहे. धडक कारवाई असो किंवा पेट्रोलिंग हे सर्व काम महिला पोलीस कर्मचारी करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या नागरिकांचे समुपदेशन (Counseling of Citizens) किंवा क्लरिकल कार्यच महिलांना दिले जात होते. आता मात्र त्या सर्वांना सक्षम करण्याच कार्य पोलीस विभागकडून होतंय.
लोहारा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिलाच करतात. लोहारा पोलीस स्टेशन 7 वर्षापूर्वी लोहारा पोलीस ठाण्याची स्थापन झाली. येथे आता 60 कर्मचारी आहेत. अशावेळी एका पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी महिलाना दिल्यानं त्या सक्षमपणे काम करू शकतात असा विश्वास व्यक्त महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व जागांवर महिलांची नेमणूक केली आहे
अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे यांनी दिली.
या आगळ्या वेगळ्या धाडसी निर्णयाची चर्चा राज्य पोलीस दलात आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी या म्हणीप्रमाणे पोलीस ठाण्याच्या कारभार महिलांच्या हाती दिल्याने नागरिकांनी सुद्धा दिलासा व्यक्त केला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून या महिला पोलीस ठाण्यात अत्यंत चोखपणे आपलं काम महिला पार पाडत आहे. आजच्या महिलादिनी या रणरागिनींच्या कार्याला सलाम.