PM Narendra Modi : यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांचे शुभाशीर्वाद, पत्र वाचून ढोरे कुटुंब भारावले

| Updated on: Dec 23, 2021 | 10:12 AM

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, अॅड राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशिर्वाद देखील दिले आहेत.

PM Narendra Modi : यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांचे शुभाशीर्वाद, पत्र वाचून ढोरे कुटुंब भारावले
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमधील ढोरे कुटुंबियांना पंतप्रधान मोदींचे पत्र
Follow us on

मुंबई : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, अॅड राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण (Wedding) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. आणि चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशिर्वाद देखील दिले आहेत.

आर्णी गावातील ढोरे कुटुंब भारावले

ढोरे यांच्या पत्राला उत्तर देताना मोदींनी ढोरे कुटुंबाचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आणि वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले आहेत. ढोरे कुटुंबियांना हे पत्र 22 डिसेंबर मिळाले असून तेंव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून ढोरे कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

काय आहे मोदींचा शुभेच्छा संदेश?

राहुल आणि मयुरी तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा…विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. नवजीवनात तुम्हाला सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा… असंही त्यात मोदींनी म्हटलं आहे.

एका छोट्याश्या गावातील एका तरुणाने आपल्या लग्नाची पत्रिका देशाच्या सर्वोच व्यक्तीला पाठवली आणि त्यांनी प्रतिसाद दिल्याने गावामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून शुभ संदेश पाठविल्याने ढोरे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या : 

देशात ओमिक्रॉनचे वाढते आकडे, पंतप्रधान मोदींची आज हायलेव्हल बैठक, देश पुन्हा लॉकडाऊनकडे जातोय?

PM modi : पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस, मोदींनी विनायक राऊतांना विचारले…