यवतमाळ : जिल्हाधिकारी (Collector) अमोल येडगे यांच्या राहत्या बंगल्यावर उंदीर पकडण्याच्या गम ट्रॅप(Gum Trap)मध्ये एक साप (Snake) अडकल्याचा प्रकार घडला. तो त्यात अडकल्यानंतर तडफडत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी MH 29 हेल्पिंग हँड्स टीमचे नीलेश मेश्राम यांना कॉल करून दिली. यानंतर टीमला तो विषारी साप असल्याचं आढळलं.
विषारी जातीचा नाग
सविस्तर माहिती अशी, की संबंधित घटनेबद्दल स्वत: जिल्हाधिकारी येडगे यांनी MH 29 हेल्पिंग हँड्सच्या टीमला याविषयी माहिती दिली. टीमचे सदस्य जिल्हाधिकारी येडगे यांच्या घरी पोहोचल्यानंचर त्यांना तिथं विषारी जातीचा नाग हा साप गम ट्रॅपमध्ये चिकटलेला आढळला. यावेळी टीमनं त्याला कोणतीही इजा न होता कोकोनट (खोबरेल) तेलाच्या साहाय्यानं ट्रॅपमधून त्याची सुटका केली.
Video : उंदराऐवजी गम ट्रॅपमध्ये अडकला नाग! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातला प्रकार, हेल्पिंग हँड्स टीमनं केली सुटका pic.twitter.com/22wME7sZsP
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2022
उपचार करून जीवदान
टीमला थोडी जास्त मेहनत करावी लागली. कारण खोबरेल तेलााच्या सहाय्यानं त्यांनी त्याची सुटका करण्याचा प्रयत्न केला तरीही नागाच्या शरीरावर ट्रॅपमध्ये असलेला चिकटपणा एकदम घट्ट चिकटून बसला होता. त्यामुळे यवतमाळ इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात त्या नागावर उपचार करून त्याला जीवदान देण्यात आलं. तर उंदीर पकडण्याच्या गम ट्रॅपमध्ये उंदराच्या मागे हा साप जात होता. त्या प्रयत्नातच तो यात अडकला, अशी माहिती मिळतेय.