Yavatmal Tiger | सैराटच्या सल्या अन् लंगड्याला झाले आर्चीचे दर्शन, यवतमाळातील टिपेश्वर अभयारण्यामध्ये अखेर गाठले

| Updated on: May 17, 2022 | 6:09 PM

यंदाच्या उन्हाळ्यात आर्ची या वाघिणीसह तिच्या बछड्यांनी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. वन्यप्राण्यांसाठी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर वाघ पाणी पिण्यासाठी येतात. त्यांचे ठरावीक ठिकाण असल्याने तेथेच ते येतात, असं प्रा. बाळकृष्ण सरकते यांनी सांगितलं.

Yavatmal Tiger | सैराटच्या सल्या अन् लंगड्याला झाले आर्चीचे दर्शन, यवतमाळातील टिपेश्वर अभयारण्यामध्ये अखेर गाठले
सैराटच्या सल्या अन् लंगड्याला झाले आर्चीचे दर्शन
Image Credit source: t v 9
Follow us on

यवतमाळ : सैराट फेम ( लंगड्या) म्हणजेच तानाजी गालगुडे (Tanaji Galgude), सल्या म्हणजे अरबाज यांनी आज टिपेश्वर अभयारण्यमध्ये व्याघ्र दर्शन केले. त्यांना 135 बिटमधील आर्ची वाघिणीचे दर्शन झाले. त्यांच्या या सफारीसाठी योगेश ठोंबरे (Yogesh Thombre) यांनी सहकार्य केले. योगेश हा त्यांचा गाईड होता. त्याच्याच देखरेखीत त्यांना आर्चीला जवळून पाहता आले. सैराटमध्ये काम केल्यामुळं तानाजी आता प्रकाशझोतात आहे. अरबाजचेही असंच झालं. या दोघांनी टिपेश्वर अभयारण्यात (Tipeshwar Sanctuary) येण्याचं ठरवलं. सकाळी ते अभयारण्यात गेले. सफारी करताना व्याघ्रदर्शन व्हावं, असं साऱ्यांनाच वाटतं. तशीच काहीशी आस लावून तानाजी आणि अरबाज बसले होते. ती आस पुरी झाली. पण, विशेष म्हणजे यावेळी त्यांना आर्चीचे दर्शन झाले. आर्ची ही या अभयारण्यातील एक वाघीण आहे. सैराट चित्रपटातही आर्ची होती, ती वेगळी बरं का…

पर्यटकांना भुरळ टिपेश्वर अभयारण्याची

यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या टिपेश्‍वर अभयारण्यात वाघांसह वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात पर्यटकांना व्याघ्र दर्शन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशातील पर्यटकांची गर्दी टिपेश्‍वर अभयारण्यात वाढत आहे. उन्हाळ्यात शाळा व महाविद्यालयांना सुटी आहे. कोरोनाच्या दोन वर्षानंतर नागरिकांना घराबाहेर पडायला मिळाले आहे. त्यातच टिपेश्‍वर अभयारण्यात बच्चे कंपनीही उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसतात. टिपेश्‍वर अभयारण्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध असल्याने गर्दी होताना दिसते. निसर्ग सौंदर्य आणि वाघांनी टिपेश्‍वर अभयारण्य नटलेले आहे.

आर्चीसह बछडे वेधतात लक्ष

टिपेश्वर येथे मुंबई, पुणे, हैदराबाद, निजामाबाद, कर्नाटक यासह इतर भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. 148 किलोमीटर परिसरात टिपेश्‍वर अभयारण्य आहे. अभयारण्यामुळे जवळपास शंभरपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आहे. सकाळी साडेपाच वाजात जंगल सफारीसाठी प्रवेश दिला जाते. वाघ, निलगाय, रानडुक्कर, चिंकारा या वन्यप्राण्यांसह दुर्मिळ पक्षीही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. यंदाच्या उन्हाळ्यात आर्ची या वाघिणीसह तिच्या बछड्यांनी पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. वन्यप्राण्यांसाठी असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर वाघ पाणी पिण्यासाठी येतात. त्यांचे ठरावीक ठिकाण असल्याने तेथेच ते येतात, असं प्रा. बाळकृष्ण सरकते यांनी सांगितलं. टिपेश्‍वर अभयारण्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. पर्यटकांच्या गर्दीने हा परिसर फुलून जात आहे. पर्यटकांना व्याघ्र दर्शन होत आहे.

हे सुद्धा वाचा