यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागावच्या पोखरी (Mahagaon Pokhari) येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचे सेंट्रींग कोसळल्याने यामध्ये मिस्त्री आणि मजूर असे पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. टाकीचे बांधकाम कोसळल्याची माहिती काही क्षणात सगळीकडे व्हायरल झाली. त्यानंतर तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु असल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे गावकरी (Yavatmal news in marathi) म्हणत आहे. त्याचबरोबर आता ठेकेदारावर काय कारवाई होणार याकडे सुध्दा अनेकांचं लक्ष लागलं आहे. सध्याची घटना ही मोठी होती, परंतु यामध्ये कसल्याची प्रकारची जिवितहाणी झालेली नाही.
पाण्याच्या टाकीचं बांधकाम कोसळल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी करावी अशी देखील चर्चा सुरु आहे. जखमी झालेल्या रुग्णांवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी असं देखील ते म्हणत आहे.
पोखरी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन योजने अंतर्गत पाईपलाईन व पाण्याच्या टाकीचे 1 कोटी 70 लाखाचे बांधकाम सुरू होते. सदर बांधकाम यवतमाळ येथील ठेकेदार करत आहेत. त्यांनी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळे ही घटना घडली असल्याचं गावकरी म्हणत आहेत.
बांधकाम अचानक कोसळल्यामुळे तिथं काम करीत असलेले पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. लोकांना टाकीचं बांधकाम कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर काहीवेळ तिथं गर्दी झाली होती. जखमी मजूरांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणात ठेकेदारांवर काय कारवाई याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.