यवतमाळ : कळपातून भटकलेल्या एक नीलगायीने (Nilgai) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील विडूळ येथे तब्बल 6 तास धुडगूस घातला. या नीलगायीने 2 जणांना जखमीही (Injured) केले आहे. जंगलातील रोहीच्या कळपाचा काही श्वानाने पाठलाग केला. त्यामुळे कळपातील एक नीलगाय (रोही) विडूळ या गावाकडे भरकटली. कळपापासून दूर गेल्याने ही नीलगाय सैरभर झाली. ती गावात सैरावैरा पळू लागली. तिने अनेक घरांचा आश्रय घेतला. गावकरीही तिला हाकलून लावणासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे ही नीलगाय आणखीनच सैरावैरा पळू लागली. अखेर गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर बचाव पथक अखेर दाखल झाले. मात्र गावकऱ्यांची यादरम्यान धावपळ उडाली होती. सैरभैर पळत असलेल्या नीलगायीला कशाप्रकारे नियंत्रणात आणावे, हे गावकऱ्यांना लक्षात येत नव्हते.
सहा तासानंतर केलं बेशुद्ध
गावाकऱ्यांनी वनविभागाला बोलावले. मग वनविभागाचे बचाव पथक गावात दाखलही झाले. पण विभागालाही गायीने शांत बसू दिले नाही. पथकाने नीलगायीला बेशुद्ध कारण्याचा प्रयत्न पथकाने केला. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नाने या नीलगायीला बेशुद्ध करण्यात बचाव पथकाला यश मिळाले. अखेर या नीलगायीला वनविभागाने ताब्यात घेतल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गावकऱ्यांची धावपळ
वनविभागाने नीलगायीला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आता या जखमी नीलगायीवर उपचार करून तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. मात्र तब्बल सहा तास या नीलगायीने गावकऱ्यांना वेठीस धरले होते. वनविभागाने तिला ताब्यात घेतल्याने सर्वांना दिलासा मिळाला. नीलगाय गावात शिरल्यानंतर गावकऱ्यांची धावपळ झाली होती. तर जेव्हा वनविभागाने नीलगायीला पकडले त्यावेळी एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली.
कळपातून भरकटलेल्या Nilgaiचा तब्बल सहा तास गावात धुमाकूळ, Yavatmal जिल्ह्यातला Video Viral#yavatmal #nilgai #wild #ViralVideo #Viral #Trending #socialmedia #Maharashtra #animals pic.twitter.com/sOpN037ai4
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 13, 2022
आणखी वाचा :