यवतमाळात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू (Two youths drowned in water) झाला. गणपती विसर्जनाच्या आनंदावर विरजण पडलं. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान घडली. महागाव येथील सोपान बबन गावंडे(16) व गोकुळ दत्ता टेटर (17) अशी मृतकांची नावे आहे. दोघेही गणपती विसर्जनासाठी (Ganapati immersion) महागाव नजीकच्या नाल्यावर गेले होते. सोबतचे लोकं परत आले. परंतु, ही दोन मुले परत आली नाहीत. .
गावकरी त्यांना शोधायला पुन्हा नाल्यावर परत गेले. दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. त्यांना लगेच उपचारासाठी आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे सोपान याला आर्णी येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.गोकुळ टेटर याला पुढील उपचारासाठी यवतमाळ पाठवण्यात आले. मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
सोपान आणि गोकुळ हे इतरांसोबत गणपती विसर्जनासाठी नाल्यावर गेले. गणपतीचं विसर्जन झालं. त्यावेळी ते पाण्यात उतरले. पण, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. इतरांना याची कल्पना आली नाही. ते विसर्जन करून घरी गेले. पण, घरी गेल्यानंतर सोपान आणि गोकुळ दिसले नाही. पुन्हा नाल्यावर जाऊन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तोपर्यंत उशीर झाला होता. दोघांचेही मृतदेह नाल्यावरील पाण्यावर तरंगताना दिसले.
गणपती विसर्जन थाटामाटात केलं जाते. त्यासाठी नाचत कुदत बाप्पाला निरोप देण्यासाठी नाल्यावर नेण्यात येते. पण, दरवर्षी अशा दुर्घटना घडतात. तरीही विशेष काळजी घेतली जात नाही. त्यातून अशा दुर्घटना घडतात. त्यामुळं विसर्जन करताना सावध असणं आवश्यक आहे. अन्यथा फार मोठं नुकसान सोसावं लागते.