यवतमाळ : धावंडा नदीच्या पुलावरून मंगरुळपीरच्या ( Mangrulpeer) दिशेने जाणारा एक अवैध रेती वाहतूक करणारा भरधाव ट्रक पलटला. दिग्रस शहरातील (Digras City) वाल्मिकनगर भागातून जाणाऱ्या दिग्रस-आर्णी बायपासवर ही घटना घडली. अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक टिप्पर गेल्या काही दिवसांपासून रात्री शहरातून भरधाव वेगाने धावत आहेत. पोलिसांच्या कारवाईपासून (Police Action) वाचण्यासाठी म्हणून हे ट्रक, टिप्पर शहरातून जात असताना अतिशय वेगाने जातात. पुलाचे कठडे तोडून धावंडा नदी पात्रात पलटी झाला. ट्रक एवढा भरधाव वेगाने होता की त्या ट्रकने पलटी मारली. या अपघातात ट्रक चालक व सोबत असलेल्या एकाला गंभीर मार लागला. त्यांना तात्काळ काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रेतीची अवैध उपसा पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात होतो. कधीकधी पोलीस कारवाई करतात. काहींचे हप्ते बांधलेले असतात. त्यामुळं ते तसेच सोडून देतात. तरीही काहीवेळी दाखविण्यासाठी कारवाई करावी लागते. यासाठी रेतीची चोरी करणारे पोलीस दिसले की, सुसाट गाडी चालवितात. त्यांना आपण सापडू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. कारण सापडलो तर चालान फाडावी लागेल. ट्रक जप्त केला जाईल, अशी भीती असते. त्यामुळं ट्रकचालक सुसाट गाडी चालवित असल्याची माहिती आहे. या ट्रक नदीत पडला. चालक-वाहक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या रस्त्यावरून रेतीची अवैध वाहतूक केली जाते. त्यामुळं पोलीस त्याठिकाणी सावज हेरत टपून बसलेले असतात. अशाच सावजाच्या मागे ते लागले असावेत. त्यामुळं ट्रकचालकाने ट्रकचा वेग वाढविला. या वेगाचा तो बळी पडला. चालक-वाहक दोघेही जखमी झाले. ट्रकने पुलावरील कठडे तोडून सरळ नदीपात्रात झेप घेतली. पण, नदीत पाणी नसल्यानं ट्रक पलटला. चालक-वाहकांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.