गर्दीतही डास (Mosquitoes) आपल्यालाच जास्त चावतात, असे तुम्हालाही वाटते का? किंवा इतर व्यक्तींना सोडून डास आपल्याकडेच जास्त आकर्षित होतात, असं तुम्हाला वाटतं का ? तुमचा रंग आणि शरीराला येणारा गंध यामुळे डास आकर्षित होत असतील. पण एका नव्या अभ्यासातून अशी माहिती समोर आली आहे की, तुमचे डाएट, (diet) खाण्यापिण्याच्या सवयी, आहार (food habits) या गोष्टीही डासांना तुमच्याकडे आकर्षित करण्यासाठी कारणीभूत ठरतात. या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की. आपण जे काही खातो किंवा पितो त्याचा परिणाम आपल्या श्वसन आणि त्वचेच्या मायक्रोबायोमवर होऊ शकतो. अशा वेळी खाण्यामुळे डास तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. काही लोकांना डास चावल्यानंतर जास्त वेदना होतात आणि सूज येते. हे कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळेही (immunity) होऊ शकते. डाएट किंवा आहार, डासांना कसा आकर्षित करू शकतो, हे जाणून घेऊया.
हे आहे डास आकर्षित होण्याचे कारण –
मानवी शरीरात संयुगे तयार होतात, जे व्हीओएस नावाने ओळखले जाते. आपल्या शरीरात असलेले लॅक्टिक ॲसिड. कार्बनडायऑक्साइ़ड आणि अमोनिया सारखी संयुगेही डासांना तुमच्याकडे आकर्षित करू शकतात. आम्ही तुम्हाला अशा काही कारणांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे डास तुमच्याकडे आकर्षित होऊन चावू शकतात.
मद्यपान –
ज्या व्यक्ती मद्यपान करतात त्यांना डास जास्त चावतात, असे संशोधनातून समोर आले आहे. याचे कारण म्हणजे, मद्यपान केल्यामुळे किंवा मद्य सेवन केल्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि या स्थितीत व्हीओसी बदलू लागतात. जर तुम्हाला डास चाऊ नयेत, असं वाटत असेल तर मद्यसेवन टाळावे.
कॅफेन –
जे लोक चहा किंवा कॉफीचे अतिसेवन करतात, किंवा ज्यांना त्याची सवय असते, अशा लोकांना डास जास्त चावतात, असेही संशोधनातून समोर आले आहे. तज्ज्ञांच्या सांण्यानुसार, कॅफेनमुळे मेटाबॉलिज्म (चयापचय क्रिया) वाढते आणि त्यामुळे शरीराचे तापमानही वाढते. असे मानले जाते की, डास हे गरम त्वचेकडे सहजरित्या आकर्षित होतात. त्यामुळे जर तुम्हाला डासांपासून वाचायची इच्छा असेल, तर बाहेर जातावा कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
लो कार्ब डाएट –
अहवालानुसार, ज्या व्यक्ती कमी कार्ब्स असलेले पदार्थ खातता, त्यांनाही डास जास्त चावतात. त्याशिवाय त्वचेची देखभाल केली पाहिजे व स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे. अस्वच्छ जागी डास लवकर पोहोचतात, त्यामुळे स्वच्छता ठेवली पाहिजे.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)