मुंबई : पुढच्या म्हणजेच मे महिन्यात तुम्हाला तुमची सावली (shadow) हरवलेली दिसेल. तुम्हाला तुमची सावली दिसणार नाही. तुम्हालाच काय तर कोणत्याही वस्तूची सावली दिसणार नाही. म्हणजेच तुम्हाला ‘झिरो शॅडो डे’चा (zero shadow day)अनुभव घेता येईल. या दिवसात सूर्य वेगवेगळ्या शहरांमध्ये दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान अगदी डोक्यावर असणार आहे. त्यामुळे यादरम्यान कोणत्याही वस्तूची सावली 90 अंशाच्या कोनात राहील. तुम्हाला यादिवशी तुमची सावली हरवल्याचं दिसून येईल. तुम्हालाही या शून्य (zero) सावलीचा थरार अनुभवता येऊ शकतो. ते अनुभवनं देखील अगदी सोपं आहे. एखादी वस्तू जमीनीवर सरळ उभी करा, ही वस्तू उभी केल्यास तुम्हाला शून्य सावलीचा थरार अनुभवता येईल.
पृथ्वीचा अक्ष हा 23.30 अंशांनी कलला असल्यामुळे आपण सूर्याचे दक्षिणायन,उत्तरायण व दिवसाचे लहन मोठे होणे अनुभवत असतो. याचाच परिणाम म्हणून विशिष्ट दिवशी शून्य सावलीचा अनुभव येतो.22 मार्चला पृथ्वीचे दोन्ही ध्रुव हे सूर्याकडे असताता. त्यामुळे यादिवशी समान कालावधीचा दिवस व रात्र असते. या दिवशी विषृववृत्तावर सूर्यकिरणे लंबरुप पडतात. 21 जूननंतर पृथ्वी प्रदक्षिणा मार्गावर पुढे जात राहते. त्यामुळे 23 सप्टेंबर यादिवशी पुन्हा पृथ्वीचे दोन्ही ध्रुव सूर्यासमोर येतात. विषृववृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. या दिवशी पुन्हा दिनमानसारखा अनुभव येतो.
बंगळुरूमध्ये रविवारी झिरो शॅडो डे साजरा करण्यात आला. चेन्नईच्या तामिळनाडू विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र कोट्टुपुरम येथे रविवारी तो साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी सूर्याचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सावलीचे फोटो काढले आणि हा खास प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. हा दिवस असतो, तेव्हा दिवसाच्या एका विशिष्ट वेळी सूर्य आपल्या डोक्याच्या अगदी वर येतो, ज्यामुळे आपल्यासाठी कोणतीही सावली तयार होत नाही, म्हणूनच या स्थितीला शून्य सावली म्हणतात.