नवी दिल्लीः सोन्यावरून जीव ओवाळून टाकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) बुधवारी सोने-चांदीचे (Gold – silver) दर (Rate) स्वस्त झालेले पाहायला मिळाले. त्यात 24 कॅरेट सोन्याचे (999 शुद्धता) दर 10 ग्रॅममागे 49440 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे (916 शुद्धता) दर 10 ग्रॅममागे 45287 रुपये नोंदवले गेले. चांदीच्या दरातही घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर 63045 रुपये नोंदवले गेले. सोन्या-चांदीचे दर दिवसांतून दोन वेळेस जारी केले जातात. पहिल्या वेळेस सकाळी आणि दुसऱ्या वेळेत संध्याकाळी. विशेष म्हणजे या दरात चढ-उतार झालेली नक्कीच पाहायला मिळते. ibjarates.com नुसार 995 शुद्ध सोन्याचे दर 49242 रुपये नोंदवले गेले. तर 916 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 45287 रुपये नोंदवली गेली. मात्र, 750 शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होत 37080 रुपयांपर्यंत खाली आलेले दिसले, तर 585 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 28922 रुपये नोंदवली गेली.
किती रुपयांनी झाले स्वस्त?
सोन्या-चांदीच्या दरात रोज बदल होतो. एखाद्या दिवशी सोन्याची किंमत वाढते, तर एखाद्या दिवशी अचानक कमी झालेली दिसते. आज दोन्हीच्या किमतीमध्ये पडझड पाहायला मिळतेय. गेल्या काही दिवसांच्या प्रमाणात आज चोवीस कॅरेट म्हणजेच 999 शुद्धतेच्या सोने 138 रुपये स्वस्त झाले आहे. तर 995 शुद्धतेचे सोने 137 रुपये स्वस्त झाले आहे. तर बावीस कॅरेट म्हणजेच 916 शुद्धतेचे सोने आज 126 रुपयांनी स्वस्त झाले. त्याशिवाय 750 शुद्धतेचे सोने 104 रुपयांनी स्वस्त झाले. 585 शुद्धतेचे सोने आज 81 रुपयांनी स्वस्त झाले. तर 999 शुद्धतेच्या चांदीमध्ये 60 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, येणाऱ्या काळात सोन्याचे दर महागण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
कोठे पाहता येतील दर?
सोन्या-चांदीचे दर तुम्हाला घरी बसूनही पाहता येतील. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवार वगळता ibja कडून हे दर जाहीर केले जातात. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर काहीच वेळात तुमच्या मोबाइलवर सोन्या-चांदीच्या दराचा मेसेज येऊन धडकतो. याशिवाय आपली माहिती अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही www.ibja.com या ibjarates.com वरही सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊन शकतात.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!