नवी दिल्ली : न्यूयॉर्कमधील (News York) एका सुपरमार्केटमध्ये (Super Market) शनिवारी जोरदार गोळीबार (Firing) झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करणार्या तरूण 29 वर्षीय आहे, तो कॉनकलिन परिसरात राहतो, त्याचं नाव पीटन गेंड्रोन असे आहे. आरोपींनी 13 जणांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यामध्ये 11 कृष्णवर्णीय होते. बफेलो शहरापासून दूर उत्तरेला गोळीबार झाला असल्याची माहिती प्राथमिक माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे.
जखमा किती खोल आहेत हे शब्दात सांगता येत नाही.
आरोपींनी बफेलो येथून बंदुकीतून गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, ही द्वेष आणि जातीय प्रेरित हिंसा आहे. तसेच बफेलोचे महापौर बायरन ब्राउन म्हणाले की, हे खूप वाईट आहे. आम्हाला वाईट वाटत आहे आणि अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. आमच्या जखमा किती खोल आहेत हे शब्दात सांगता येत नाही.
क्षेत्र टाळण्यासह कायद्याची अंमलबजावणी आणि स्थानिक अधिकार्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्याचे आदेश
बंदुकधारी व्यक्तीने प्रथम टॉप्स सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये चार जणांवर गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन जण मारले गेले, नंतर आत जाऊन गोळीबार सुरूच ठेवला, असे ग्रामाग्लिया यांनी सांगितले. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी देखील ट्विट केले आहे. त्यात ती परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बफेलोमधील लोकांना “क्षेत्र टाळण्यासह कायद्याची अंमलबजावणी आणि स्थानिक अधिकार्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करण्यास सांगितले.”
नेमकं काय झालं
बंदुकधारी संपूर्ण घटनेचे लाईव्ह स्ट्रीम करत होता. त्यावेळी तो लष्करी उपकरणे असलेल्या एका दुकानात घुसला आणि लोकांना पार्किंगच्या ठिकाणी खेचत नेत होता. यानंतर त्याने आरोपींनी लोकांच्यावरती गोळीबार सुरू केला.
संशयित सुपरमार्केटमध्ये प्रवेश करताना आणि इतर अनेक बळींना गोळ्या घालताना स्पष्ट दिसला आहे. विशेष म्हणजे या गोळीबारात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला.