100 गावगुंडांचा दलित वस्तीवर हल्ला, फायरिंगनंतर लावली घरांना आग, कुठं घडली ही घटना?

| Updated on: Sep 19, 2024 | 9:10 AM

गावगुंडांनी दलित वस्तीवर हल्ला केला आणि 80 घरं जाळली. गुंडांनी गोळीबार केला. जमिनीच्या मालकी वादातून हा प्रकार घडला. सध्या पोलिसांनी मुख्य आरोपीसह 10 लोकांना अटक केली आहे. तर इतर आरोपींची धरपकड सुरू आहे. या घटनेमुळे प्रशासन हादरले आहे.

100 गावगुंडांचा दलित वस्तीवर हल्ला, फायरिंगनंतर लावली घरांना आग, कुठं घडली ही घटना?
दलित वस्तीवर हल्ला
Follow us on

बिहारमधील नवादा जिल्ह्यात गावगुंडांनी दलित वस्तीवर हल्ला केला. त्यांनी या भागात 50 राऊंड फायरिंग केले. मुफस्सिल पोलीस ठाण्यातंर्गत कृष्णानगर गावात गुंडांनी दलित वस्तीमधील 80 घरांना आग लावली. आता याप्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोन्ही पक्ष जमिनी त्यांची असल्याचा दावा करत आहेत. पण ही जमीन बिहार सरकारची असल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी मुख्य आरोपीसह 10 लोकांना अटक केली आहे. तर इतर आरोपींची धरपकड सुरू आहे. पोलिस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.

100 हून अधिक जणांचा हल्ला

गावातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 100 हून अधिक गावगुंड अचानक दलित वस्तीत घुसले. त्यांनी अचानक गोळ्या झाडल्या. त्यामुळे या भागातील लोक घाबरले. गुंडांनी जवळपास 50 राऊंड फायरिंग केले. स्वतःला वाचवण्यासाठी वस्तीतील लोकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. त्यानंतर गुंडांनी या वस्तीला आग लावली. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलीस अधिक्षकांनी तातडीने धाव घेतली.

हे सुद्धा वाचा

लागलीच केली कारवाई

पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तात्काळ दहा आरोपींना ताब्यात घेतले. गावातील नागरिकांनीच या आरोपींची ओळख पटवून दिली. डीएम आशुतोष कुमरा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे गाव नदीच्या किनारी वसलेले आहे. आम्ही हा परिसर पाहिला. या ठिकाणी 30 घरे जळाली आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्य आरोपीला अटक

नवादाचे पोलीस अधिक्षक अभिनव धीमान यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. त्यात 40 ते 50 घरांना आग लावल्याचे समोर येत आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही अथवा कुणाचा मृत्यू झालेला नाही. गुंडांनी हवेत गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुख्य आरोपीसह 10 जणांना अटक केली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने इतर आरोपींची ओळख पटवली आहे. त्यांची धरपकड सुरू आहे.

जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. दोन्ही पक्ष अनेक वर्षापासून या जमिनीवर ताबा सांगत आहेत. त्यातून ही घटना घडली आहे. जोपर्यंत शांतता राहणार नाही, तोपर्यंत पोलिसांचा आता येते तळ राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. तर बिहार सरकारच्या अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचे मंत्री जनक राम यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.