उत्तर प्रदेश | 3 मार्च 2024 : उत्तर प्रदेशातील कौशाम्बी जिल्ह्यात लग्नाची वरात चालू असताना मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे लग्नघरातील आनंदावर विरजण पडले. लग्नाची वरात सुरु असताना डीजेच्या तालावर सर्वजण बेधुंद होऊन नाचत असताना अचानक डीजेसह नवरदेवाच्या मित्रासह तीन जणांना 11,000 व्होल्टच्या हायटेंशन वायरच्या वीजप्रवाहाचा प्रचंड शॉक लागला. त्यामुळे दोन सख्या भावांसह तीन जणांना रुग्णालयात डॉक्टरांना तपासून मृत घोषीत केले. त्यामुळे लग्नघरात मातम पसरला. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ही घटना भरवारीच्या वॉर्ड क्र.7 रामनगर ( उसरा ) येथील आहे. कौशांबी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुल्हनियापूर गावातील सम्मारी लाल प्रजापती यांचा मुलगा पिंटू प्रजापती याचे लग्न अमृता हिच्याशी योजले होते. शनिवारी लग्नाची वरात उसरा पोहचली तेव्हा सर्व वऱ्हाडी नाश्ता झाल्यानंतर डीजेच्या तालावर बेधुंद नाचत होते. वधूच्या घरापासून वरात 400 मीटर अंतरावर असताना गावाला वीज पुरवठा करणाऱ्या खांबांची 11,000 व्होल्टची वीजवाहीनीचा स्पर्श डीजेला झाला. त्यामुळे वीजेचा जोरदार झटका बसून वराचे मित्र राजेश कुमार (20 ), रवी कुमार ( 22 ) , पिता रामभवन ( दोन सख्खे भाऊ ) आणि डीजेचा कर्मचारी सतीश कुमार ( 30 ) यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर घटनास्थळी मोठी अफरातफर माजली. डीजेला कसेतरी बाजूला करुन तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांना त्यांना मृत घोषीत केले. यानंतर नातेवाईकांनी अक्षरश: हंबरडा फोडला. पोलिसांनी तिघांच्या मृतदेहांना पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी डीएसपी अवधेश विश्वकर्मा यांनी सांगितले की यावेळी पाऊस पडत असल्याने डीजे भिजू नये म्हणून त्याच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली होती. जेव्हा डीजे सुरु होता तेव्हा छत्रीचा स्पर्श खाली लटकत्या तारांना झाला असावा, त्यामुळे सतीश जखमी झाला. त्यामुळे साऊंड सिस्टीमच्या बाजूला उभे असलेले दोन अन्य व्यक्ती भाजून जखमी होत बेशुद्ध पडले. रुग्णालयात त्यांना मृत घोषीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.