ओडिसा : ओडिसा (Odisha) राज्यात सध्या सगळीकडं ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस (heavy rain) होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शनिवारी ओडिसा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. दोन तासात 61 हजारवेळी वीज कोसळली आहे. त्यामध्ये १२ लोकांचा जीव गेला आहे. त्याचबरोबर १४ लोकं जखमी झाली आहेत. त्यापैकी काही लोकांची हालत एकदम गंभीर आहे. हवामान खात्याकडून (imd) अजून पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पावसाची शक्यता असेल, त्यावेळी तुम्ही जवळच्या सुरक्षित ठिकाणी जावं अशी माहिती हवामान खात्याने जाहीर केली आहे.
हवामान खात्याने जाहीर केलं आहे की, बंगालच्या उपसागरातही एक चक्रीवादळ तयार झालं आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढच्या तीन तिथल्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सात डिसेंबरपर्यंत ओडीसा राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे.
सत्यब्रत साहू यांनी सांगितलं की, राज्यात पुन्हा मान्सून चांगलाचं सक्रीय झाला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
भुवनेश्वरमध्ये 126 मिमी, कटकमध्ये 95.8 मिमी पाऊस झाला आहे. सत्यब्रत साहू यांनी सांगितलं की, ओडीसा राज्यातील सगळ्या स्थितीवर आमचं लक्ष आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वीज कोसळण्याची घटना पाहिली, तर लोकांनी घरातून बाहेर पडू नये, शनिवारी झालेल्या दुर्घटनेत खुर्दा जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. बलांगीर या जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. अंगुल, बौध, ढेंकनाल, गजपति, जगतसिंहपुर या जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्याशिवाय गजपति आणि कंधमाल जिल्ह्यातील आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.