मुंबईः देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना (Corona) संसर्गाच्या घटनांमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिल्लीपासून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंत (Maharashtra) सर्व राज्यांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये आश्चर्यकारक वाढ होत आहे. तर दुसरीकेडे मात्र लसीकरणाच्या बाबतीत लसीकरण (Vaccination) चांगल्या प्रमाणात होत आहे. शातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा 186.72 कोटी मात्रांचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. या लसीकरणामध्ये 12 ते 14 वयोगटातील 2.47 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11 हजार 860 रुग्ण असून गेल्या 24 तासात 1 हजार 247 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असून काळजी घेण्यासाठी आणि नियम पाळण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.
?राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना सुमारे 192.27 कोटी लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध
?राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांकडे अजूनही 20.52 कोटींपेक्षा अधिक लसीच्या न वापरलेल्या उपयोगी मात्रा, शिल्लक.
?https://t.co/Uc0dfn1RFc pic.twitter.com/WzqtSIKC0v
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 19, 2022
देशातील नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती नाहीशी झाली असली तरी, देशात सध्या देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याचबरोबर दररोज या प्राणघातक साथीच्या रोगाचे रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहेत. त्याबरोबरच यावेळी मोठ्यांसोबत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीतही सरकारकडून कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा 186.72 कोटी मात्रांचा टप्पा पूर्ण केला गेला आहे.
शातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 186.72 कोटी मात्रांचा टप्पा
12 ते 14 वयोगटातील 2.47 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11,860
गेल्या 24 तासात 1,247 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
?https://t.co/DHT4R3X9DY pic.twitter.com/Jk02PZ6iQ3
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 19, 2022
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
12 ते 14 वयोगटातील 2.47 कोटींपेक्षा जास्त मुलांचे लसीकरण केले गेले आहे, तर देशातील उपचाराजधीन असलेल्या रुग्णांची संख्या सध्या 11 हजार 860 असून गेल्या 24 तासात 1 हजार 247 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दुसरीकडे मात्र रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76 टक्के असा दिलासादायक आहे. तर आठवड्यात कोरोनाचे सापडणारे रुग्ण हे 0.34 टक्के इतके आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 186.72 (1, 86,72,15,865) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,27,79,246 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 11 हजार 860 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03 टक्के इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासात 928 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4 कोटी 25 लाख 11हजार 701 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 1 हजार 247 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या 24 तासात एकूण 4,01,909 चाचण्या करण्यात आल्या असून भारताने आतापर्यंत एकूण 83.25 (83,25,06,755) कोटींहून अधिक चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.34 टक्के तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.31% आहे.
संबंधित बातम्या
Jayant Patil: आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही, मंत्री नंतर आधी कार्यकर्ता: जयंत पाटील