डी कोल्ड टोटलसह 19 औषधांवर बंदी येणार?

| Updated on: Aug 08, 2022 | 7:35 PM

तज्ञ समितीने 19 औषधांची यादी तयार केलेय. यात सुमो, निसिप, डी कोल्ड टोटल, कफ सिरप टेडीकॉफ, ग्रिलिंक्टस, कोडीस्टार, टॉसेक्स, एस्कोरिल सी, पिरिटन एक्सपेक्टोरंट आणि अँटीबायोटिक क्लिंडामायसिन यांचा समावेश आहे. या औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मा कंपन्यांमध्ये अल्केम, सिप्ला, रेकिट बेंकिसर, मॅनकाइंड फार्मा, अॅबॉट, ग्लेनमार्क आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांचा समावेश आहे.

डी कोल्ड टोटलसह 19 औषधांवर बंदी येणार?
Follow us on

दिल्ली : डी कोल्ड टोटलसह 9 औषधांवर बंदी(medicines banned) येण्याची शक्यता आहे. एका पेक्षा जास्त औषधे वापरुन ही औषधे तयार केली जातात. मेडिकल भाषेत ही औषध कॉकटेल औषध म्हणून ओळखली जातात. मात्र, या औषधांच्या वापारामुळे अँटिबायोटिक औषधांची परिणामकरकता कमी होत असल्याचा धोका आहे. यामुळे या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटने एक यादी तयार केली आहे. या यादीत 19 औषधांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालय या यादीवर निर्णय घेणार आहे.

सर्दी, ताप यासारख्या लक्षण जाणवल्यास अनेक लगेच डॉक्टर कडे जात नाहीत. या साधारण आजारात बहुतांश लोक थेट मेडिकलमध्ये जाऊन ताप, सर्दीच्या गोळ्या विकत घेतात आणि खातत. यामुळे सर्दी, ताप, खोकला यासांरख्या आजारांवर घेतल्या जाणाऱ्या औषधांची नावे अनेकांना तोंडपाठ आहेत. सर्दी तापासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या आणि काही कफ सिरप औषधांवर केंद्र सरकार लवकरच बंदी घालू शकते.

या औषधांवर बंदी घातली जाऊ शकते

तज्ञ समितीने 19 औषधांची यादी तयार केलेय. यात सुमो, निसिप, डी कोल्ड टोटल,  कफ सिरप टेडीकॉफ, ग्रिलिंक्टस, कोडीस्टार, टॉसेक्स, एस्कोरिल सी, पिरिटन एक्सपेक्टोरंट आणि अँटीबायोटिक क्लिंडामायसिन यांचा समावेश आहे. या औषधांचे उत्पादन करणाऱ्या फार्मा कंपन्यांमध्ये अल्केम, सिप्ला, रेकिट बेंकिसर, मॅनकाइंड फार्मा, अॅबॉट, ग्लेनमार्क आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांचा समावेश आहे.

काय येणार या औषधांवर बंदी

या सिरप आणि टॅब्लेटमध्ये एकापेक्षा जास्त औषधे असतात. त्यांना फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन म्हणतात. सामान्य भाषेत याला कॉकटेल औषध असेही म्हणतात. विकसित देशांमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांच्या विक्रीवर बंदी आहे. आता भारताने अशा 19 सिरप आणि गोळ्यांची यादी तयार केली आहे, ज्यावर लवकरच बंदी घातली जाऊ शकते. या अशा प्रकारच्या औषधांची यादी तयार करण्यासाठी डॉ. एम.एस. भाटिया, प्राध्यापक आणि प्रमुख, मानसोपचार विभाग, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती तयार करण्यात आली. केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटनेकडून 19 FDC ची यादी तयार केली. ही यादी आता आरोग्य मंत्रालयाला देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

कॉकटेल औषध म्हणजे काय? याचे दुष्परिणाम काय?

एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण असलेल्या सिरप किंवा टॅब्लेटला एफडीसी किंवा कॉकटेल औषध म्हणतात. कॉकटेल औषधाच्या वाढत्या वापराचे काही दुष्परिणाम देखील दिसून आले आहेत. अँटिबायोटिक कॉकटेल औषधांच्या जास्त वापरामुळे अँटिबायोटिक परिणामकारकता कमी होण्याचा धोका आहे. यामुळेच आता सरकारने कॉकटेल ड्रग्जबाबत कडक भूमिका घेतली आहे.