केरळ : केरळ (kerala) राज्यातील मलप्पुरम (Malappuram) जिल्ह्यातील तनूर परिसरातील तुवलथिरम समुद्र किनाऱ्यावर 30 लोकांनी भरलेली काल एक बोट उलटली. बोट उलटल्यानंतर (boat mishap) 20 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. मृत्यूमध्ये अधिकतर मुलं असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधानांनी या घटनेबद्दल ट्विट करीत दुख: व्यक्त केले आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दोन-दोन लाख देण्यात येणार असल्याची घोषणा देखील नरेंद्र मोदींनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ट्विट केले आहे, त्यामध्ये लिहीलं आहे की, ‘केरळमधील मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने मला दुःख झाले आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.’
Pained by the loss of lives due to the boat mishap in Malappuram, Kerala. Condolences to the bereaved families. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be provided to the next of kin of each deceased: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 7, 2023
बोट उलटल्याची घटना घडली त्यावेळी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर एक पत्रक काढून मलप्पुरम जिल्हाधिकारी यांना शोध मोहिम सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अग्निशमन दल आणि पोलीस तुकड्या, महसूल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर जिल्ह्यातील तनूर आणि तिरूर भागातील स्थानिक लोक बचाव कार्यात सहभागी झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. मंत्री अब्दुररहिमन आणि रियास हे बचाव कार्याचे समन्वय साधतील.
त्याचबरोबर केरळच्या पर्यटन मंत्र्यांनी सुध्दा याबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितले की, बोट उलटल्याची माहिती मिळाली त्यावेळी आम्हाला धक्का लागला. झालेल्या दुर्घटनेत अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. एका शाळेची मुलं त्या बोटीत फिरायला आली होती, अजून मुलं बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. त्या मुलाचं शोधकार्य सुरु आहे.
घटनास्थळी पोहोचलेले पोलिस या प्रकरणाच्या चौकशीत गुंतली आहे. घटना कशामुळे घडली आणि कशी घडली याची पोलिस चौकशी करीत आहेत. पोलिस अधिकाऱ्याने एका माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना सायंकाळी सात वाजता घडली आहे. आतापर्यंत ज्या लोकांचे मृतदेह पाण्यात सापडले आहेत, त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांवरती उपचार देखील सुरु आहेत. दुर्घटना कशामुळे घडली याचं कारण अद्याप सापडलेलं नाही. पोलिस संपुर्ण प्रकरणाची चौकशी करीत आहे.