नवी दिल्ली : पूर्वोत्तर राज्य मणीपूरमध्ये हिंसेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक बोलावली. अमित शाह यांनी मणीपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्यासोबत व्हिडीओ काँफरन्सिंगवरून बैठक घेतली. मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. गृह मंत्रालयाने अर्धसैनिक दलाच्या १० अतिरिक्त कंपन्या पाठवण्याचा निर्णय घेतला. बैठकीत गृह मंत्रालय आणि मणीपूरचे वरिष्ठ अधिकार उपस्थित होते.
कालच्या तुलनेत मणीपूरमध्ये परिस्थिती चांगली आहे. सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी ही माहिती दिली. वेगवेगळ्या २३ ठिकाणी जवानांना तैनात करण्यात आले आहे. हिंसेत आतापर्यंत सुमारे १८ ते २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. १०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Union Home Minister Amit Shah on Friday reviewed the situation in Manipur in a video conference meeting with Chief Minister N. Biren Singh and top officials in the state as well as the Centre. 10 more companies of Central Armed Police Forces sent to Manipur today: Sources
(File… pic.twitter.com/hcTVNzoCmx
— ANI (@ANI) May 5, 2023
कुलदीप सिंह यांनी सांगितलं की, हिंसेत सुमारे ५०० घरं जाळण्यात आली. हिंसेच्या पहिल्याच दिवशी आरोपींना अटक करण्यात आली. ९ जणांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून नागरिकांनी चोरलेले हत्यार जप्त करण्यात आले. ६००९०३०४२२ आणि ०३८५२४५०२१४ हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
कलम ३५५ अन्वये केंद्र सरकार कोणत्याही राज्यातील सुरक्षा आणि कायदा व्यवस्था आपल्या हाती घेऊ शकते. राज्यात अशांतता माजल्यास हा उपाय करण्यात येतो. हिंसा भडकल्यानंतर शांत होत नसेल अशावेळी केंद्र सरकार हस्तक्षेप करते. परंतु, बैठकीत कलम ३५५ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. हिंसाग्रस्त मणीपूरमध्ये कलम ३५५ चा वापर केला जाणार नाही. कालच्या तुलनेत आज चांगली परिस्थिती आहे.