200 रुपयांची हिऱ्यांची ‘खाण’, नशिबवान मजुराला मिळाला 80 लाखांचा हिरा

| Updated on: Jul 25, 2024 | 9:03 PM

मध्य प्रदेशातील पन्ना येथे खाणकाम करताना एका मजुराला एक हिरा सापडला आहे. ज्याची किंमत 80 लाख ते 1 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे त्या मजुराने अवघ्या 200 रुपयात ही खाण खरेदी केली होती.

200 रुपयांची हिऱ्यांची खाण, नशिबवान मजुराला मिळाला 80 लाखांचा हिरा
diamond
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मध्य प्रदेशातील पन्ना येथील खाणीत एका मजुराला हिरा सापडल्याची बातमी आली आहे. या हिऱ्याची किंमत 80 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, लिलावात त्याचा दर आणखी वाढू शकतो. विशेष म्हणजे या मजुराला हिरा सापडलेल्या ठिकाणी खोदाईचा पट्टा आहे. त्याने दोन महिन्यांपूर्वीच ही खाण अवघ्या 200 रुपयात घेतली होती. राजू गोंड असे या पन्नामध्ये नशिबवान मजुराचे नाव आहे. त्याचे वडील चुनवडा गोंड यांनी दोन महिन्यांपूर्वीच हीरा ऑफिस लीजवर घेतले होते. राजू हा ट्रॅक्टर चालक असून तो खाणीतही काम करतो. याच राजूला उत्खननात एक चमकदार हिरा सापडला आहे.

मध्यप्रदेश मधील पन्ना येथे हिऱ्याच्या अनेक खाणी आहेत. येथील खाण एक वर्षासाठी फक्त 200 रुपये भाडे देऊन लीजवर घेऊ शकतो. हिरे अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही व्यक्ती पन्नामध्ये हिरे शोधण्यासाठी खोदकाम करू शकते. त्यासाठी 200 रुपये भाडेपट्टी घ्यावी लागते. व्यक्तीचे फोटो, आधार कार्ड आणि 200 रुपये शुल्क जमा केल्यावर भाडेपट्टा एक वर्षासाठी दिला जातो. त्यानंतर पुन्हा ही खाण कार्यालयाकडे जमा करावी लागते.

हिरे शोधण्यासाठी कार्यालयाकडून 8 बाय 8 मीटरची जागा दिली जाते. जिथे खोदकाम करता येते. सरकारी खाणींसह अनेक प्रकारच्या खाणी येथे आहेत. ही जमीन कोणत्याही व्यक्तीची असू शकते. विशेष म्हणजे या लीजमध्ये खोदकाम केल्यावर पुन्हा त्या जागेच्या जमिनीत माती टाकावी लागते. हिरा सापडला तर तो बाहेर काढून उकरलेली माती पुन्हा जमिनीत टाकावी लागते.

एखाद्या खाणीत हिरा सापडला तर तो पन्ना संयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या हिऱ्याच्या कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर त्याचे वजन करून जमा करून घेतला जातो. सरकार काही काळानंतर त्याचा लिलाव करते. ज्यामध्ये असे हिरे विकले जातात. लिलावासाठी 5000 रुपये शुल्क आकारले जाते. हिरा विकल्यानंतर लिलावातून मिळणाऱ्या रकमेतून सुमारे 12 टक्के रॉयल्टी वजा करून हिरे अधिकारी उर्वरित 80 टक्के रक्कम हिरेधारक भाडेकरूच्या खात्यात वर्ग करतात.