दरम्यान सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याने, मदत आणि बचाव कार्य हे थांबविण्यात आल्याची घोषणा टेकनाथ सितौला, प्रवक्ते, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू, नेपाळ यांनी केली आहे. तसेच त्यांनी आज संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जातील असेही सांगितले आहे.
Ad
तारा एअरचे विमान
Image Credit source: tv9
Follow us on
काठमांडू:तारा एअरच्या विमानाच्या (Tara Air plane) ढिगाऱ्यातून 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रविवारी खराब हवामानात देशाच्या डोंगराळ प्रदेशात खाजगी विमान क्रॅश (plane crash) झाल्यानंतर चार भारतीयांसह इतर सर्व प्रवाशांचा यात अंत झाला. यानंतर ती सर्व 22 मृतदेह नेपाळ लष्कराच्या एमआय-7 हेलिकॉप्टरने काठमांडूला पाठविण्यात आले आहेत. जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहेत. यादरम्यान आता नेपाळी सैन्याने केलेल्या शोध आणि बचाव मोहिमेची दृश्ये समोर येत असून त्यांनी या अवघड स्थितीत कसे बचाव कार्य केले असेल याची प्रचिती येते. या बचाव कार्याचा एक व्हिडीओ नेपाळी लष्कराकडून (Nepal Army) ANIच्या ट्वीटरवर टाकण्यात आला आहे. ज्यात लष्कराचे जवान बचाव कार्य करताना दिसत आहेत.
#WATCH | Nepal plane crash: Visuals of the search & rescue operation carried by the Nepali Army that got concluded after all 21 bodies were retrieved from the crash site at Sanosware, Thasang-2 in Mustang, earlier today.
तारा एअरचे विमान हे खराब हवामानामुळे रविवारी डोंगराळ प्रदेशात क्रॅश झाले. ज्यात चार भारतीयांसह इतर सर्व प्रवाशांचा यात अंत झाला. तर आता पर्यंत 22 मृतदेह नेपाळ लष्कराच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. तर याबाबत आता नेपाळी सैन्याने केलेल्या शोध आणि बचाव मोहिमेची दृश्ये व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच यावेळी करण्यात आलेल्या बचाव कार्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलच फिरत आहे. हा व्हिडीओ नेपाळी लष्कराकडून ANIच्या ट्वीटरवर टाकण्यात आला आहे. ज्यात प्रतिकुल परिस्थिती नसतानाही नेपाळी लष्कराचे जवान आपली भूमिका पार पाडत आहेत. ते दोरीच्या साहाय्याने खाली दरीत उतरून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत.
सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले
दरम्यान सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याने, मदत आणि बचाव कार्य हे थांबविण्यात आल्याची घोषणा टेकनाथ सितौला, प्रवक्ते, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, काठमांडू, नेपाळ यांनी केली आहे. तसेच त्यांनी आज संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जातील असेही सांगितले आहे.
तर नेपाळ लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, “एकवीस मृतदेह सापडले असून उर्वरित एकाचा शोध पथके घेत आहेत.” या विमानात चार भारतीयही होते. विमान बेपत्ता झाले तेव्हा वैभवी त्रिपाठी आणि तिचा माजी पती आणि त्यांची दोन मुलेही त्यात होती. मात्र आता उर्वरित एक मृतदेह ही सापडला असल्याने हे मदत आणि बचाव कार्य थांबविण्यात आले आहे.
100 मीटरच्या आत मृतदेह विखुरले
तारा एअरच्या प्रवक्त्याने स्थानिक मीडियाला सांगितले की मुख्य इम्पॅक्ट पॉइंटच्या 100 मीटरच्या आत मृतदेह विखुरले होते. ते म्हणाले की, विमानाचे तुकडे झाले आणि ते डोंगरावर आदळले. त्यानंतर सर्वत्र लोकांचे मृतदेह विखुरले गेले.