अमेरिकी प्रतिनिधीसभेच्या स्पीकर नॅसी पेलोसी
अमेरिकी प्रतिनिधीसभेच्या स्पीकर नॅसी पेलोसी (Nassy Pelosi) यांच्या तायवान भेटीमुळं चीनचा तिडपापड झालाय. या भेटीवरून तायवानसह अमेरिकेलाही चीननं धमकी दिली आहे. पेलोसी तायवानच्या बाहेर जाताच चीनने वायूसीमेत (airspace) शिरकाव केलाय. चीनचे 27 फायटर तायवानच्या सीमेत शिरले. नॅसी पेलोसीशी संबंधित चर्चा सोशल (social media) मीडियात रंगली. विबोवर (मायक्रोब्लॉगिंस प्लॅटफार्म) युजर्सची संख्या खूप वाढली. त्यामुळं वीबोचे प्लॅटफार्म क्रश झालंय.
- चीनमध्ये नॅसी पेलोसीच्या तायवान भेटीवर चर्चा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्यावरून चिनी सोशल मीडियावर देशभक्तीची लहर दिसून येते. कित्तेक इंटरनेट युजर्सनं अमेरिकेबद्दल कडक शब्दात भावना व्यक्त केल्या. पेलोसी यांच्या दौऱ्यावरून राष्ट्रीय एकीकरणासारखे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
- चीननं तायवानच्या चारही बाजूला कारवाईसाठी लाईव्ह फायर सैन्य अभ्यासाची घोषणा केली. तसेच तायवानसह आशियात जाणाऱ्या वैमानिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
- तायवानच्या सुरक्षा मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आवाहन देणारं पाऊल असल्याचं म्हटलंय. चीननं अशाप्रकारचे प्रयोग स्वतंत्रतेचे कारण असल्याचं सांगितलं. चिनी विदेशी मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनईंगने पत्रकारांना सांगितलं की, चिनी सैन्य कारवाई तायवानसाठी इशारा आहे.
- सेंट्रल न्यूज एजन्सी सीएननुसार, चीनच्या तणावाच्या परिस्थितीत तायवानने विमान उड्डाणासाठी विकल्प शोधण्यासाठी जपान आणि फिलीपाईंससोबत बोलणं सुरू केलंय.
- पेलोसी यांच्या दौऱ्यानंतर चीननं तायवानच्या रेतीच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. तायवानच्या बेटावरील फळ आणि माशांच्या उत्पादनावरील आयातीवर बंदी आणली आहे. चीनने तायवान फाउंडेशन फॉर डेमोक्रसी आणि विदेश मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि विकास फंड विरोधात कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
- पेलोसी 25 वर्षांत तायवानचा दौरा करणाऱ्या उच्चस्तरीय अमेरिकी अधिकारी ठरल्या. यापूर्वी कित्तेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी तायवानचा दौरा केल्याचं स्पष्ट केलंय.
- चीनच्या प्रतिक्रियेवर पेलोसी म्हणाल्या, चीननं खूप गोंधळ घातला. कारण मी स्पीकर आहे. मला माहीत नाही की, हे कारण होतं की फक्त सोंग. लोकांमध्ये आल्यानंतर मी काहीही बोलली नसल्याचं त्यांचं म्हणणंय.